आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लग्नाच्या 38 वर्षांनंतर अशी होते हालत, मी सेल्फी काढत आहे आणि पती मोबाइलमध्ये व्यस्त आहे\', नीतू कपूर यांनी ऋषि कपूर यांच्यासोबतचा फोटो केला शेअर आणि सांगितली मनातली गोष्ट   

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऋषि कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. मात्र ही गोष्ट अजून कळलेली नाही त्यांना कोणता आजार झाला आहे. याचदरम्यान नीतू कपूर यांनी पतीसोबत लंच करतानाच एक सेल्फी क्लिक करून आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेयर केला आहे. फोटो शेयर करत त्यांनी कॅप्शन लिहिले, 'लंच डेट.. असे होते लग्नाच्या 38 वर्षानंतर, नवरा फोनमध्ये व्यस्त आहे आणि मी सेल्फी क्लिक करत आहे'. (Lunch date 🤪 this is what happens after 38 years of marriage husband on the phone and I’m clicking selfies 🙄🙈). या फोटोमध्ये ऋषि कपूर पहिल्यापेक्षा जास्त कमजोर दिसत आहे. सोशल मीडियावर ऋषि कपूर यांचा फोटो पाहून यूजर्स त्यांना लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. एकाने तर विचारले देखील की, कँसर आहे का ?

 

मोबाइलमध्ये व्यस्त दिसले ऋषि कपूर...
- या फोटोमध्ये ऋषि कपूर आपल्या मोबाइलमध्ये व्यस्त दिसत आहेत. लंच करतेवेळी टेबलवर वाइनचे दोन ग्लास आणि आणि बॉटलही दिसत आहे, तुम्हाला संगी इच्छितो की, 22 जानेवारीला ऋषि-नीतू यांच्या लग्नाला 39 वर्ष पूर्ण होतील. 

 

तीन महिन्यांपासून अमेरिकेत आहेत ऋषि कपूर... 
ऋषि कपूर मागच्या तीन महिन्यांपासून अमेरिकेमध्ये उपचार घेत आहेत. ते 29 सप्टेंबर, 2018 ला भारतातून गेले होते. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती देत लिहिले होते, "सर्वांना हॅलो, एक उपचार घेण्यासाठी अमेरिकेला जात आहे. मी माझ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी कोणताही चुकीचा आणि खोटा अंदाज लावू नये. मला चित्रपटांत काम करून 45 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सदिच्छांच्या जोरावर मी लवकरच परत येईन". 

- ऋषि यांच्या न्यूयॉर्कला जाण्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 1 ऑक्टोबरला त्यांची 87 वर्षांची आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. मात्र त्यांच्या अंतिम संस्काराच्यावेळी ना ऋषि कपूर तेथे होते ना त्यांचा मुलगा आणि पत्नी तेथे दिसले. त्यानंतर मीडियामध्ये त्यांना कँसर झाला असल्याची बातमी पसरली होती. पण ऋषि कपूर यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. 

 

बातम्या आणखी आहेत...