आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neetu Kapoor Reveals Many Years Later, Used A Hair Dresser Hand For A Magazine Photo Shoot

नीतू कपूर यांनी अनेक वर्षांनी केला खुलासा, मॅगझिनच्या फोटोशूटसाठी हेअर ड्रेसरचा हात केला होता यूज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री नीतू कपूरने सोशल मीडियावर एका मॅगझिनच्या कव्हर फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये नीतूने अनेक वर्षांनी एक खुलासा केला आहे की, फोटोमध्ये जो हात दिसत आहे, तो त्यांचा नाहीये तर त्यांच्या हेअर ड्रेसरचा आहे. हे फोटोशूट नीतूने स्टाइल अँड स्टार मॅगझीनसाठी केले होते.  
 

 

यासाठी केला होता एक्सपेरिमेंट... 
नीतूने सांगितले की, फॅशन फोटोग्राफर राकेश श्रेष्ठने एक एक्सपेरिमेंट म्हणून कव्हर फोटोची कन्सेप्ट तयार केली होती. यामध्ये त्यांना एक असा चेहरा दाखवायचा होता जो लाल लिपस्टिकसोबत लाल नेलपॉलिश असलेल्या हातांसोबत होता. कारण त्यावेळी नीतूची नखे छोटी होती आणि त्यामुळे राकेशने नीतू यांच्या हेअर ड्रेसरचा हात यूज केला होता. मात्र नीतू यांना या हाताची पोजीशन आता खूपच विचित्र वाटत आहे.  
 

 

परतल्याबद्दल लिहिली इमोशनल पोस्ट... 
यापूर्वी नीतूने ऋषी कपूर यांच्या 11 महिन्यापर्यंत भारतात परतण्याबद्दल एक भावुक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले, मागच्या 11 महिने कुठे गेले ? हा एक मोठा प्रवास होता. हे एक असे पाऊल होते ज्याने मला खूप काही शिकवले.  

बातम्या आणखी आहेत...