आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणी चूक : ब्लड बँकेने O+ ऐवजी दिले A- रक्त, डॉक्टर-नर्सनेही न पाहताच 3 वर्षाच्या चिमुरडीला दिले, अचानक सुरू झाली ब्लिडींग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालावाड - येथील जिल्हा रुग्णालयातील पेडियाट्रिक विभागात पीआईसीयूमध्ये अॅडमिट असलेल्या 3 वर्षांच्या चिमुरड्याला चुकीच्या ब्लडग्रुपचे रक्त चढवण्यात आले. त्याच्या रिअॅक्शनमुळे चिमुरडीची तब्येत बिघडली आणि ब्लिडींग सुरू झाली. गंभीर अवस्थेत चिमुरडीनवर वेळीच उपचार करत डॉक्टरांनी तिचा जीव वाचवला. पण एवढी मोठी चूक झाली कशी हा प्रश्न कायम आहे. कारण रुग्णालय आणि ब्लड बँक प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. 


रक्त देताच बिघडली तब्येत 
झालावाडच्या मोहनलाल टेलर यांच्या मुलीच्या शरिरात रक्त तयार होत नाही, त्यामुळे शरिरात रक्ताची कमतरता होती. तिचे हिमोग्लोबिन 5 ग्रॅमच राहिल्याने तिला रक्त देण्यासाठी रुग्णालयात दाखल केले होते. बालविभागात तिच्या रक्ताचे सॅम्पल घेण्यात आले. सॅम्पल ब्लड बँकेत क्रॉस मॅच केल्यानंतर ब्लड इश्यू करण्यात आले. ब्लड आले तेव्हा ते मुलीला शरिरात डॉक्टरांनी सोडले. पण त्यानंतर काही वेळातच रिअॅक्शन सुरू झाली. मुलीला प्रचंड थंडी वाजू लागली, उलटी झाली आणि नंतर ब्लिडींग सुरू झाली. ब्लिडिंग एवढी जास्त झाली की, हिमोग्लोबिन 3.5 ग्रॅमवर आले. त्याठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी लगेचच परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आणि मुलीला वाचवले. नंतर तिला फ्रेश ब्लड देण्यात आले. मुलीचा ब्लड ग्रुप 'ओ' पॉझिटिव्ह होता तिला 'ए' पॉझिटिव्ह रक्त देण्यात आले. 


दुसऱ्यांदा रक्त आले तेव्हा समजली चूक 
मुलीला 'ओ' पॉझिटिव्ह ऐवजी 'ए' पॉजिटिव रक्त दिले जात होते. मुलीला ब्लिडींग झाल्यानंतर रक्त देणे थांबवायला हवे होते, पण कोणीही लक्ष दिले नाही. संपूर्ण रक्त दिल्याने मुलीची अवस्था अधिक खराब झाली. रिअॅक्शनमुळे संपूर्ण रक्त शरिरातून निघाले. त्यामुळे पुन्हा रक्त आणले तेव्हा ते तिच्या ग्रुपचे म्हणजे 'ओ' पॉझिटिव्ह होते. तेव्हा समजले की मुलीला चुकीचे रक्त दिले होते. 


नर्सिंग कर्मचाऱ्यांनी चिठ्ठी पाहिली नाही 
ब्लड बँक रक्ताच्या पिशवीबरोबर एक चिठ्ठी देत असते. त्यावर सर्व डिटेल्स असतात. पण नर्सिंग स्टाफने त्याकडे लक्षच दिले नाही. त्यांनी काहीही चेक न करता मुलीला रक्त दिले. त्यांनी चेक केले असते तर हे घडलेच नसते. 


ब्लड बँकेत होते क्रॉस मॅच 
संबंधित विभागाकडून डॉक्टर रुगणाचे एक सँपल घेऊन फॉर्म भरतात. त्यात रुग्णाचे नाव, पत्ता, हिमोग्लोबिन, ब्लड, प्लेटलेट्स याची माहिती अशते. ते सँपलसह ब्लड बँकेत येते. ब्लड बँकेत सॅम्पल क्रॉस मॅच केले जाते. त्यासोबत एक चिठ्ठी असते. त्यावर ब्लड ग्रुप, रक्त किती जुने आहे आणि केव्हापर्यंत वापरता येईल हे लिहिलेले असते. 


ब्लड ग्रुप बदलल्यास होते ही रिअॅक्शन 
डॉक्टरांनी सांगितले की, दुसऱ्या ग्रुपचे रक्त चढवले तर ब्लड सेल्स तुटतात. त्यामुळे रक्त शरिरात टिकत नाही. कधी कधी त्याच ब्लड ग्रुपचे रक्त चढवले तरी रिअॅक्शन होऊ शकते. वेगवेगळ्या ब्लड ग्रुपमुळे वेगवेगळ्या रिअॅक्शन होऊ शकतात. 

बातम्या आणखी आहेत...