आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा धुपिया आणि अंगद बेदीची लाडकी लेक झाली एक वर्षाची, फोटो शेअर केला पण दाखवला नाही मुलीचा चेहरा 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची लाडकी लेक मेहर हिचा आज वाढदिवस असून ती एक वर्षाची झाली आहे. 18 नोव्हेंबर 2018 रोजी नेहा आणि अंगदच्या आयुष्यात मेहरची एन्ट्री झाली होती. लाडक्या लेकीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नेहा आणि अंगद अमृतसरला पोहोचले आहेत. इन्स्टाग्रामवर अंगदने नेहा आणि मुलगी मेहरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अंगद आणि नेहा ब्लू कलरच्या ड्रेसमध्ये तर नेहा यलो-ब्लू कलरच्या कुर्त्यात दिसत आहे. त्यांच्या होतात एक फुगा असून त्यावर 1 लिहिला आहे. तिघांचे हे फोटो अतिशय सुंदर आहेत. 

2018 मध्ये मे महिन्यात अंगद आणि नेहा यांनी दिल्लीतील एका गुरुद्वारात गुपचुप लग्न थाटले होते. दोघांनी लग्नाची बातमी सोशल मीडियावर फोटो शेअर करुन दिली होती. लग्नाच्या वेळी नेहा गर्भवती होती. लग्नाच्या सहा महिन्यांनी त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला होता.