आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदन/ लग्नाच्या 6 महिन्यांनंतर नेहा धूपिया आणि अंगद बेदीला कन्यारत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. मे 2018 मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या नेहा धूपिया आणि अंगद बेदीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. एन्टटेन्मेंट वेबसाइट स्पॉट बॉयच्या वृत्तानुसार नेहा आणि अंगदच्या घरी 18 नोव्हेंबरच्या सकाळी मुलीचा जन्म झाला. नेहाने मुंबईतील खार येथील वीमेन्स हॉस्पिटलमध्ये बाळाला जन्म दिला. 

 

प्रेग्नेंसीमुळे गुपचूप केले होते लग्न 
नेहाने आपल्या इंस्टाग्रामवर बेबी बंपसोबतचा फोटो शेअर करुन प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. नेहा प्रग्नेंट असल्यामुळे तिने घाईघाईत लग्न केले होते. काही दिवसांपुर्वी स्वतः अंगदने ती लग्नापुर्वीच प्रेग्नेंट असल्याचे उघड केले होते. 

 

1. वर्षे डेटिंगनंतर केले होते लग्न 
नेहा आणि अंगदच्या अफेअरच्या चर्चा लग्नापुर्वीपासून होत्या. 2017 मध्ये क्रिकेटर जहीर खान आणि सागरिका घाटगेच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हे कपल पोहोचल्यापासून अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. नेहा आणि अंगद त्यांच्या डेटिंगविषयी काहीच बोलले नव्हते. पण त्यांनी त्याच्या 1 वर्षानंतरच लग्न केले.  

बातम्या आणखी आहेत...