आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा धूपियाने 5 बॉयफ्रेंडला एकाचवेळी फसवणाऱ्या मुलीचा केला बचाव, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अभिनेत्री नेहा धूपियाला गुरुवारी सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. नेहा सध्या एमटीव्हीचा शो 'रोडीज रिव्हॉल्यूशन' सीजन जज करत आहे आणि याच शोमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे यूजर्सच्या निशाण्यावर आली आहे. झाले असे की, शोदरम्यान जेव्हा एका कन्टेस्टंटने सांगितले की, त्याने आपल्या गर्लफ्रेंडला चपाती मारली होती, कारण तिने माझ्याव्यतिरिक्त आणखी पाच बॉयफ्रेंड बनवले होते. हेच ऐकून नेहा भडकली आणि त्याला म्हणाली की, ती त्या मुलीची चॉईस आहे. 

मुलाचे बोलणे ऐकल्यावर नेहा त्याला म्हणाली की, 'तू हे काय मुर्खासारखे बोलत आहेस की, ती इतर 5 मुलांसोबत गेली होती. तर माझेआईक ही तिची चॉईस आहे, तिला कुणासोबत फिरायचे आहे. कदाचित समस्या तुझ्यासोबत आहे, जर ती चीट करत आहे तर कदाचित ती तुझ्यासोबत खुश नाही. कोणतीही गोष्ट तुला एखाद्या मुलीवर हात उचलण्याचा अधिकार देत नाही.'

नेहाच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोक तिला फेक फेमिनिस्ट म्हणत ट्रोल करू लागले. यूजर्सने खूप सारे फोटो आणि मीम शेअर करत नेहाचा विरोध केला आणि तिची खूप खिल्ली उडवली. 

बातम्या आणखी आहेत...