आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालदीवमध्ये पती अंगद बेदीसोबत सुट्ट्या एन्जॉय करत आहे नेहा धूपिया, स्वतः शेअर केला फोटो 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया पती अंगद बेदीसोबत मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. अशातच नेहाने आपले काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये नेहा आणि अंगद बीचवर मस्ती करताना दिसत आहे. नेहाच्या या फोटोजचे फॅन्स खूप कमेंट करत आहे. हे फोटोजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अभिनेत्री आपल्या पतीसोबत खूप सुंदर क्षण जगत आहे. नेहाने सुट्ट्यांवर जाण्यापूर्वी आपली मुलगी मेहरच्या कपड्यांचे पॅकिंग करतानाच फोटो शेअर केला होता. आपल्या मुलीच्या कपड्यांसोबतचा फोटो शेअर करून तिने लिहिले, 'जेव्हा तुम्ही बीच डेस्टिनेशनसाठी आपल्या बाळाची बॅग पॅक करता. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की, कपडे खूप क्यूट आणि आरामदायक असले पाहिजेत.'
 

 

अभिनेत्री नेहा धूपियाने मागच्यावर्षी मे महिन्यात अंगद बेदीसोबत लग्न केले होते. नोव्हेंबरमध्ये नेहाने मुलगी मेहरला जन्म दिला होता.