आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • नेहा धूपिया, अंगद बेदी, युवराज सिंह, Neha Dhupia Hubby Angad Bedi Revealed He Dated 75 Women

पत्नीच्या लाइव्ह शोमध्येच झाली अॅक्टरची पोलखोल, 75 तरुणींना केले डेट, म्हणाला- एकाच छतावर केली होती 75 तरुणींसोबत पार्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - नेहा धूपियाचा पती अंगद बेदीने आपल्या आयुष्यातील सीक्रेटचा खुलासा पत्नीच्याच चॅट शोमध्ये केला. नेहाचा चॅट शो 'नो फिल्टर नेहा'मध्ये या वेळी पती अंगद सहभागी झाला होता. शोदरम्यान अंगदने सांगितले की, त्याने आपल्या आयुष्यात तब्बल 75 तरुणींना डेट केले आहे. एवढेच नाही, यातील काही जणी तर वयाने त्याच्यापेक्षा मोठ्याही होत्या. त्याने नेहाच्या शोचा प्रोमो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे, नेहासुद्धा अंगदपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे.


- नेहा धूपिया सध्या प्रेग्नंट असूनही विविध कार्यक्रमांत सक्रिय दिसत आहे. पार्टीज-फंक्शन्सशिवाय ती तिच्या चॅट शोमध्येही दिसत आहे.

- नेहा तिच्या शोमध्ये अनेक बॉलीवुड सेलेब्सना इन्वाइट करते. या वेळी तिने पती अंगदला इन्वाइट केले.  नेहाद्वारे डेटिंगच्या प्रश्नावर अंगद म्हणाला की, त्याने तब्बल 75 तरुणींना डेट केले आहे. अंगद म्हणाला- 'मी कडक शिस्तीत मोठा झालो. मी खूप लाजराबुजराही होतो. दिल्लीहून जेव्हा मुंबईला शिफ्ट झालो तेव्हा सर्व गोष्टी बदलल्या. नवे मित्र भेटले आणि खूप एन्जॉयही करू लागलो. यानंतर डेटिंगही सुरू केली. डेटिंगदरम्यान काही तरुणी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. एक तर 10 वर्षे मोठी होती.


बालपणीची मैत्री तुटली
अंगदने सांगितले- 'माझा बालमित्र क्रिकेटर युवराज सिंह माझ्यावर नाराज आहे. आणि नाराजीचे कारण माझे लग्न आहे. मी माझ्या लग्नाचे युवराजला सांगितले नव्हते.' शोमध्ये अंगदने आपली चूक कबूल केली आणि स्पष्टीकरण देत म्हटले- 'लग्न घाईगडबडीत केले होते. मी युवीवर खूप प्रेम करतो. आमच्यात पहिल्यासारखे रिलेशन नाही हेसुद्धा कबूल करतो.

- एक प्रश्नाचे उत्तर देताना अंगद म्हणाला- 'एक दिवस मी आणि रणविजय सोबत होतो आणि आम्ही युवराजच्या घराच्या टेरेसवर तब्बल 75 तरुणींना पार्टीसाठी बोलावले होते.' यावर नेहाने विचारले की, एवढ्या मुलींना का बोलावले? तर उत्तर मिळाले- मुलींशिवाय पार्टीच होऊ शकत नाही.

- शोच्या प्रोमोमध्ये नेहा-अंगदची केमिस्ट्रीही पाहायला मिळाली. अंगद, नेहाला छेडताना दिसला. यावर नेहाने त्याला रागावत म्हटले- 'तू जास्त बदमाशी करू नकोस.' यावर अंगद म्हणतो- 'अरे एकटेच आहोत..'

- या वर्षी मेमध्ये नेहा-अंगदने गुपचूप लग्न उरकले होते. आणि मग ऑगस्टमध्ये नेहाच्या प्रेग्नन्सीचे समोर आले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...