आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नेहा कक्कड-आदित्य नारायणच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल, टीआरपीसाठी केला लग्नाचा ड्रामा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे की, नेहा कक्कड आणि आदित्य नारायण व्हॅलेन्टाईन डेला लग्न करणार आहेत. आता त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पंडित मंत्रोच्चारासोबत त्याच्या विवाहाचे विधी संपन्न करताना दिसत आहे. मात्र, हे पब्लिसिटी स्टंटपेक्षा जास्त काहीही नाहीये. दोघांनी मेकर्ससोबत प्लॅनिंगअंतर्गत हा पूर्ण ड्रामा रचला आहे, जेणेकरून टीआरपी मिळू शकेल.  

मागच्या महिन्यात आदित्य नारायणचे पेरेंट्स उदित नारायण आणि दीपा नारायण 'इंडियन आयडल' मध्ये आले होते आणि त्यांनी ही घोषणा केली होती की, त्यांचा मुलगा नेहा कक्कडसोबत लग्न करणार आहेत. नेहाचे पॅरेंट्सदेखील शोमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी या नात्याला परवानगीदेखील दिली होती. मात्र, दोघांच्या पॅरेंट्सचे शोमध्ये पोहोचून लग्नाची गोष्ट कन्फर्म करणेदेखील शोच्या स्क्रिप्टचाच भाग होता.  

उदित यांनी मान्य केले हा होता पब्लिसिटी स्टंट... 

अशातच एका मुलाखतीमध्ये उदित नारायण म्हणाले होते, त्यांचा मुलगा आदित्य आणि नेहा कक्कड यांचे लग्न होणार आहे. हे केवळ 'इंडियन आयडल' ची टीआरपी वाढवण्यासाठी केला गेलेला एक पब्लिसिटी स्टंट होता. उदित नारायण म्हणाले, नेहा आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची चर्चा फक्त टीआरपीसाठी केली जात आहे. आदित्य आमचा एकुलता एक मुलगा आहे. त्याच्या जीवनात असे काही घडले तर त्याने आम्हाला नक्कीच सांगितले असते. आदित्य-नेहाच्या लग्नाची गोष्ट खरी असती तर मी आणि माझी पत्नी सर्वात जास्त खुश झालो असतो. पण आदित्यने आम्हाला याबद्दल कधीच काहीही सांगितले नाही."

उदित यांनी पुढे सांगितले होते की, "मला वाटते की, आदित्य आणि नेहा यांच्या लग्नाची अफवा 'इंडियन आयडल' ची टीआरपी वाढवण्यासाठी पसरवली गेली होती, जिथे माझा मुलगा होस्ट आहे आणि नेहा जज म्हणून दिसत आहे. कशी या अफवा खऱ्या असत्या. नेहा खूप गोड मुलगी आहे. आम्हाला तिला आमची सून करून घ्यायला खूप आवडेल."

0