आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिमांशबरोबरच्या ब्रेकअपचे दुःख, नेहा कक्कड म्हणाली-एवढ्या वाईट अनुभवानंतर पुन्हा प्रेमात पडणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका नेहा कक्कड अखेर आपल्या ब्रेकअपविषयी बोललीच. आता ती आपले पहिले प्रेम म्हणजेच गायनावर लक्ष्य केंद्रित करणार आहे. नेहाने पहिल्यादांच दैनिक भास्करसोबत ब्रेकअप, गायन आणि भविष्यातील इतर प्रकल्पांविषयी चर्चा केली... 

 

गेल्या महिन्यात अभिनेता हिमांश कोहलीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर नेहा कक्कड खूपच कठीण परिस्थितीतून निघाली. दोघांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केले. त्यांनतर त्यांच्यात बिनसले आणि ते वेगळे झाले. याविषयी नेहा सांगते..., माझ्या आयुष्यात तो काळ फारच अवघड होता. मी नैराश्यात गेले होते. त्यातून बाहेर पडणे खूपच अवघड झाले होते. ब्रेकअपचा सामना करणे खूच अवघड होते. खरं तर आता मी यातून पूर्णपणे बाहेर आले आहे. आता एकटे राहणे माझ्या आयुष्यात सर्वात चांगला अनुभव अाहे, असे मला वाटते. मी जेव्हा रिलेशनशिपमध्ये होते तेव्हा कुटुंब, मित्रांना वेळ देऊ शकत नव्हते. त्या वेळी मी माझा सर्व वेळ आणि ऊर्जा ज्या माणसाला समर्पित केली तो त्याच्या लायकीचा नव्हता. त्या माणसामुळे मी माझे नातेवाईक, भाऊ-बहिणी यांच्यासोबत चांगला वेळ घालवू शकले नाही, त्यांचे अनेक कार्यक्रम माझ्या हातून सुटले. इतका वेळ देऊनही तो वेळ देत नसल्याची तक्रार करायचा. बरं झालं हे नातं पुढं गेलं नाही. 


एकाच छताखाली दिसतील सर्वच कक्कड 
नुकतेच एमटीव्ही अनप्लग्डने मला 'कक्कड' स्पेशल करण्याची ऑफर दिली होती, ती मी स्वीकारली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच आम्ही तिघे टोनी कक्कड, सोनू कक्कड आणि मी अनप्लग्ड व्हर्जनसाठी गाणार आहोत. सध्या यापेक्षा उत्कृष्ट जीवनात काहीच असू शकत नाही, असे मला वाटते. माझा भाऊ टोनीची गाणी गाण्याचा मी निर्णय घेतला आहे. सर्वच गाणी वेगवेगळी असतील. ती लोकांनी कधीच ऐकली नसतील. 


रिमिक्समध्ये काहीच वाईट नाही 
'जे गायक रिमिक्स किंवा रिक्रिएट करतात त्या लोकांना नेहमीच वाईट म्हटले जाते. मात्र यात काहीच चुकीचे नाही, असे माझे मत आहे. आजपर्यंत मी जे गाणे गायले त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. नवीन पिढीला नवीन व्हर्जनमध्ये जुनी प्रसिद्ध गाणी ऐकायला मिळत आहेत. यात काय चुकीचे आहे? लोकांना ती गाणी आधीच आवडतात, त्यामुळेच आम्ही ती गाणी पुन्हा बनवतो. पुढे 'टिप टिप बरसा पानी' गाणे रिक्रिएट करण्याची माझी इच्छा आहे. 


अभिनय करणे आवडेल 
मला अभिनायाच्यादेखील अनेक ऑफर आल्या आहेत. खरं सांगायचं झालं तर मी कोणतीही ऑफर स्वीकारणार नाही. यामागचे कारणही तसेच आहे. मागचे रिकॉर्ड््स पाहिले तर अनेक गायकांनी आधी अभिनय केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे मी त्यांच्यात सामील होणार नाही. मी आधीच सिंगल गायिका आहे, त्यातल्या त्यात अयशस्वी अभिनेत्री होऊ इच्छित नाही. 

बातम्या आणखी आहेत...