आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्कडला पुन्हा आली बॉयफ्रेंडची आठवण, गाणे गाऊन काढला राग, म्हणाली, \'काही विचार करून बोलला असशील तू हे, हे प्रेमही मोजले असेल तू\' सोशल मीडियावर व्हायरल झाला Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : फेमस सिंगर नेहा कक्कडचे भिनत हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाले आहे. आता नेहा कक्कडचे एक न्यू सॉन्ग व्हिडीओ सॉन्ग व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा फेमस सॉन्ग 'इसमें तेरा घाटा...' गाताना दिसत आहे. पूर्ण गाणे केवळ नेहावर शूट झाले आहे. नेहाचे फॅन्स तिच्या या सॉन्गला तिचा बॉयफ्रेंड हिमांश कोहलीसोबत कनेक्ट करत आहेत. एका सोशल मीडिया यूजरने लिहिले, "नेहा आम्हाला माहित आहे तू हे गाणं तुझा Ex-बॉयफ्रेंड हिमांशसाठी गेले आहे" तर दुसरा म्हणला, "ब्रेकअपमुळे नेहा तुझे नाही हिमांशचे नुकसान आहे". आणखी एका यूजरने लिओहीले, "नेहा तुला टेंशन घेण्याची गरज नाही" या गाण्याचे बोल असे आहेत, "कुछ सोच के बोला होगा तुमने, ये प्यार भी तोला होगा तुमने, अब ना है तो फिर ना सही दिलबर... इस दिल को ये समझा लिया हमने इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता, ज्यादा प्यार हो जाता, तो मैं सेह नहीं पाता. अब और क्या केहना होगा हमने, करना था जो वो कर लिया तुमने, शायद रहूँ या ना रहूँ दिलबर, बदला कभी ये फैसला तुमने... इसमें तेरा घाटा, मेरा कुछ नहीं जाता, ज्यादा प्यार हो जाता, तो मैं सेह नहीं पाता...." याच लाइन्समुळे हे सॉन्ग नेहा आणि हिमांशसोबत कनेक्ट केले जात आहे. नोव्हेंबरच्या लास्ट वीकमध्ये नेहा-हिमांशचे ब्रेकअप झाले आहे. 

 

ब्रेकअपनंतर गेली होती डिप्रेशनमध्ये... 
- एक सोशल मीडिया पोस्ट करून नेहा कक्कडने सांगितले होते की, ती डिप्रेशनमधून जात आहे. तिने लिहिले होते, "हो मी डिप्रेशनमध्ये आहे. जगातील सर्व निगेटिव्ह लोकांना धन्यवाद, तुम्ही सर्व मला माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस दाखवण्यात यशस्वी झालात. मी तुम्हाला क्लियर करते की, हे कोना एका किंवा दोन व्यक्तींमुळे नाहीये. हे त्या लोकांसाठी आहे, जे मला माझी पर्सनल लाइफ जगू देत नाहीयेत. मी त्या लोकांचे आभार मानते जे माझे काम माझ्यावर प्रेम करतात. लोक माझ्याविषयी काहीही बोलत आहेत, काहीही न जनता की, मी कशी आहे आणि कोणत्या वेळेतून जात आहे. मी त्या लोकांकडे भीक मागते की, प्लीज मला आनंदाने जगू द्या. जजमेंटल होऊ नका, प्लीज मला जगू द्या"

 

ब्रेकअपच्या अगोदर झाले होते हिमांशसोबत नेहाचे भांडण... 
- जून 2018 मध्ये नेहा आणि हिमांश यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. तेव्हा नेहाने एक लांबलचक मेसेज लिहिला होता. ती म्हणाली होती, मी तुला माझे सर्वस्व दिले. लव्ह, केअर, टाइम, हॅपीनेस, रिस्पेक्ट, स्किल, नॉलेज, पॉझिटिव्हीटी, माझे लोक... माझे फॅन्स, इतकेच नाही तर मी मेहनतीने मिळवलेली प्रसिद्धीसुद्धा तुझ्यासोबत शेअर केली. पण तू मला क्षणात विसरला. तुझ्या अशा वागण्याने मी खूप दुखावली गेली आहे. मी खूप रडले. आता मी तुला माझे उत्तर देतेय, फाइनली गुड बाय अँड गॉड ब्लेस यू'

- नेहाच्या या पोस्टनंतर हिमांशने तिच्यासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर करुन तिची माफी मागितली होती. हिमांशने लिहिले होते, 'मला माफ कर, मी तुझ्यासोबत अतिशय रुड आणि वाईट वागलो. पण आपले नाते एवढे कमजोर नाही, की एखाद्या छोट्या चुकीने संपेल. 

 

सोशल मीडियावर ब्रेकअपनंतर व्यक्त केले होते नेहाचे दुःख... 
- नेहाने बॅक टू बॅक अनेक पोस्ट टाकल्या आहेत. यावरुन तिचे दुःख दिसतेय. तिने लिहिले की, "मी माझे सर्व काही देऊन टाकले आणि मला त्या बदल्यात मिळाले....मला काय मिळाले हे मी शेअरही करु शकत नाही."
- नेहाने पोस्टमध्ये लिहिले की, "या जगात एवढे वाईट लोक आहेत, हे मला माहिती नव्हते. 'खैर सब कुछ गंवा के होश में अब आए भी तो क्या किया' मला माहिती आहे मी एक सेलिब्रिटी आहे आणि मी असे लिहायला नको, पण मी पण एक माणूस आहे. आज खुप कोलमडले आहे, यामुळे माझ्या फिलिंग्स कंट्रोल करु शकत नाहीये."
- नेहाने पुढे लिहिले, "मला माहिती आहे आता सर्व लोक याविषयी बोलतील आणि मला यावरुनच जज करतील. लोक काय बोलतील मला माहिती नाही. मी ज्या गोष्टी केलेल्या नाही त्याविषयीही लोक बोलतील, पण मला आता हे सर्व ऐकण्याची आणि सहन करण्याची सवय झाली आहे."
- "आम्हा सेलिब्रिटीजचे 2 चेहरे असतात हे मला माहिती आहे. एक पर्सनल आणि एक प्रोफेशनल. पर्सनल लाइफ कितीही खराब असली तरीही प्रोफेशनल लाइफमध्ये हसावेच लागते."
- दिल्ली येथे राहणा-या हिमांशने 'यारियां'(2014) चित्रपटातून डेब्यू केला होता. यामध्ये नेहाने 'सनी-सनी' गाणे गायले होते. या चित्रपटाच्या सेटवर दोघांची मैत्री झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...