Home | Gossip | neha kakkar and her friend lili singh act like drunk persons

नेहा कक्कडला 'चढली' तर 'नशे' मध्ये अडखळली, मग जमिनीवर जाऊन पडली, व्हिडीओ होत आहे व्हायरल

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 03:20 PM IST

काही तासातच 11 लाखपेक्षा जास्तवेळा पहिला गेला ड्रंक नेहा कक्कडचा हा व्हिडीओ... 

  • मुंबई : 'ब्लू है पानी-पानी' आणि 'दिलबर-दिलबर' सारखे गाण्यांची सिंगर नेहा कक्कडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये नेहा आपल्या फ्रेंड लिली सिंहसोबत दिसत आहे. दोन्ही व्हिडिओमध्ये नशेत ड्रिंक करताना त्या दिसत आहेत. आधी दोघीही दारू पिण्याचा अभिनय करतात आणि दाखवतात की, त्यांना चढली नाहीये. यानंतर लिली कोल्ड ड्रिंक पिते आणि दाखवते की, त्यामध्ये नशा आहे. लिली अडखळत जमिनीवर पडते. त्यांनतर नेहाही तेच कोल्ड ड्रिंक पिते आणि नशेत असल्याचा अभिनय करत अडखळत अडखळत तीही जमिनीवर पडते. त्यानंतर दोघीही फ्रेंड्स खूप हसतात. बॅकग्राउंडमध्ये गाणे 'कोकाकोला तू' वाजते आणि त्यावर दोघीही नाचू लागतात.

    7 तासातच 11 लाखपेक्षाही जास्तवेळा पहिला गेला हा व्हिडीओ...
    नेहा कक्कडने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेयर केला नि त्यासोबत लिहिले, "चढली..." त्यांनतर तिने सुपरवुमन लिली सिंहला टॅग करून लिहिले, "सिस्टर फ्रॉम अनॉदर मिस्टर." हा व्हडिओ केवळ 7 तासातच 11 लाखपेक्षाही जास्तवेळा पहिला गेला आहे. 'कोकाकोला तू' हे गाणे नेहा कक्कडने गायले आहे, जे फिल्म 'लुका छुपी' मधील आहे. तर लिली सिंह, सुपरवुमनच्या नावाने प्रसिद्ध आहे. ती कॅनेडियन यू-ट्यूबर, कॉमेडियन, टीव्ही होस्ट आणि अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

Trending