आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर इंडियन आयडॉलच्या सेटवर रडली नेहा कक्कड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सिंगर नेहा कक्कड आणि हिमांश कोहली यांच्यातले प्रेमसंबंध आता तुटले आहेत. दोघे चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण आता मात्र त्यांच्या ब्रेकअपची चर्चा होत आहे. एवढेच नाही तर त्यांनी एकमेकांना आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरही अनफॉलो केले आहे. 

 

शूटिंगदरम्यान रडली नेहा.. 
या पर्सनल इंसीडेंटमुळे नेहाच्या प्रोफेशनल लाइफमधेही खूप समस्या उद्भवत आहेत. रिपोर्ट्सनुसार असे कळाले आहे की नेहा रियलटी शो इंडियन आयडॉलच्या शूटिंगदरम्यान सेटवरच रडली. काही दिवसांपूर्वी ती शोचे शूटिंग करत होती. तेव्हा एका स्पर्धाकाने एक इमोशनल गाणे गायले. तर ती आपले इमोशन कंट्रोल करू शकली नाही आणि रडू लागली. एवढेच नाही तर जेव्हा ती जेव्हा सेटवर आली होती तेव्हाही ती ठीक नव्हती. ती नेहमी सेटवर हसते गुणगुणत असते पण यावेळी असे झाले नाही. 

 

सूत्रानुसार, सामान्यत: नेहा कॅमेऱ्यासमोर रीटेक्स घेत नाही मग ते रडणे असो की हसणे. ते स्वाभाविकरित्या बाहेर येते. पण यावेळी मात्र गोष्टी तशा नव्हत्या. यावेळी टीमला परफेक्ट शॉट रिकॉर्ड करण्यासाठी अनेक रीटेक घ्यावे लागले. नेहा आपल्या भावनांमुळे थोडी परेशान होती. शेवटी, तिने काही वेळेसाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि मग काही वेळेच्या ब्रेकनंतर शूटिंग पुन्हा सुरु केले. नेहाने रडण्याचा भाग शोमधून काढून टाकण्यासही सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...