आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहा कक्कडने 'सिंबा'च्या गाण्यावर केला दमदार डान्स, मेकअप रुममध्ये दोन तरुणींसोबत लावले ठुमके, तासाभरात 6 लाखांहून अधिक लोकांनी बघितला Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड हिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडिओत ती 'सिंबा' चित्रपटातील 'मेरा वाला डांस' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. खास गोष्ट म्हणजे मेकअप रुममध्ये दोन तरुणीही तिच्यासोबत ठुमके लावताना दिसत आहेत. नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो सहा लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. सोशल मीडिया यूजर्स तिच्या डान्सचे कौतुक करत असून तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही प्रश्न विचारत आहेत. एका यूजरने तिला हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप का केले? असा प्रश्न विचारला आहे. तर आणखी एका यूजरने तिला ब्रेकअप मागचे कारण विचारले आहे. नेहाने या प्रश्नांची उत्तरे दिली नाही. पण व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "आनंदी राहा, आयुष्य खूप सुंदर असून कायम सकारात्मक राहा, आयुष्यात नकारात्मक भावना आणू नका आणि फक्त आनंदा वाटा."

 

एकमेकांना केले सोशल मीडियावर अनफॉलो....
- ब्रेकअपनंतर हिमांश आणि नेहा यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. इतकेच नाही तर नेहाने हिमांशसोबतचे रोमँटिक फोटोजही इंस्टाग्रामवरुन डिलीट केले आहेत.
- रिलेशनशिप संपल्यानंतर नेहा कोलमडून गेली होती. नेहाने एकामागून एक पोस्ट लिहून आपले दुःख व्यक्त केले होते. तिने लिहिले होते, 'मी माझे सर्वस्व त्याला दिले आणि त्या मोबदल्यात मला काय मिळाले.... मला काय मिळाले ते मी शेअरसुद्धा करु शकत नाही' 
- खरं तर चाहते नेहा आणि हिमांशच्या लग्नाची वाट बघत होते. काही महिन्यांपूर्वी इंडियन आयडॉलच्या मंचावरच हिमांश कोहलीने नेहा कक्कडला प्रपोज करुन तिला सरप्राइज दिले होते. दोघांनीही या शोमध्येच एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली होती.


या कारणामुळे झाले ब्रेकअप...
- नेहा-हिमांश केवळ संशयामुळे वेगळे झाले आहेत. या दोघांमध्ये भांडणाचे कारण इंडियन आयडॉलमधील एक स्पर्धक ठरला. या स्पर्धकावरुन हिमांश कायम नेहावर संशय घेऊ लागला होता, त्यामुळे नेहा त्रस्त झाली होती. 
- आता हिमांशपासून वेगळे झाल्यानंतर नेहा आयुष्यात पुढे जात आहे.
- दिल्लीचा रहिवाशी असलेल्या हिमांशने 'यारियां' (2014) चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटातील 'सनी-सनी' हे गाणे नेहाने गायले होते. या चित्रपटाच्या सेटवरच दोघांची मैत्री झाली होती.

 

बातम्या आणखी आहेत...