आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : नेहा कक्कर आज बॉलिवूडच्या टॉप-5 फीमेल सिंगर्सपैकी एक आहे. नेहा आपल्या यशाचे पूर्ण श्रेय एका मुलीला देते आणि ती मुलगी म्हणजे नेहाची मोठी बहीण सोनू कक्कर. नेहाने स्वतः सिंगिंग रियलिटी शो 'सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स' मध्ये मान्य केले होते की, तिच्या यशस्वितेमागे सोनूचा हात आहे. शोमध्ये नेहाने सांगितले होते, "मी चार वर्षांची असताना गेला सुरुवात केली होती. सोनू दीदीनेही कमी वयातच गेला सुरुवात केली होती. माझे कुटुंब म्यूजिकशी संबंधित नाही. सोनू दीदीच आमच्या घरातील पहिली सिंगर होती. जर ती नसती तर कदाचित आज मीही सिंगर झाले नसते. आज मी जे काही आहे ते केवळ सोनू दीदीमुळेच. सोनू आणि टोनी (भाऊ) माझा जीव आहेत"
नेहाचे वडील कॉलेजबाहेर विकायचे चहा-समोसा...
- नेहा सिंगिंग रिएलिटी शो 'सा रे गा मा पा लिटिल चैंप्स' ची जज होती. नेहाचा भाऊ टोनी कक्कर आणि बहीण सोनू कक्कर एका एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून आले होते. तेव्हा भाऊ आणि बहिणीला शोमध्ये पाहून नेहा खूप इमोशनल झाली होती. एवढेच नाही टोनी कक्करच्या डोळ्यातूनही अश्रू ओघळले.
- नेहाने सांगितले होते की तिच्या वडिलांनीही मुलांचा सांभाळ करण्यासाठी खूप मेहनत केली आहे. नेहा म्हणते, "पप्पा सोनू दीदीच्या कॉलेजबाहेर चहा -समोसा विकायचे, ज्यामुळे मुले तिला चिडवत होती"
- नेहाने सांगितले, "टोनीही तेव्हा खूप लहान होता. पण तेव्हा तो आम्हा दोघींसाठी गाणे बनवत होता. शेवटी त्याचे गाणे ‘मिले हो तुम हमको' हिट झाले आणि त्याला 100 कोटींपेक्षा जास्त व्यूज मिळाले. असेच हळू हळू आम्हाला यश मिळत गेले"
- नेहा 4 वर्षांची असताना तेव्हा तिने म्यूझिक शिकणे सुरु केले होते. नेहाने आपला भाऊ टोनी कक्कड आणि बहीण सोनू कक्कडकडून ट्रेनिंग घेतली आहे. नेहाने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात आपल्या भाऊ-बहिणींसोबत बाहेर गाणे गायची.
- नेहा कक्करने सिंगिंग रियालिटी शो 'इंडियन आयडल' सुद्धा जज केले आहे. विशेष म्हणजे नेहाने आपल्या करिअरची सुरुवातही या शोच्या दूस-या सीजनमधून केली होती. नेहा फक्त 11 वी क्लासमध्ये होती तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शोमध्ये सहभागी झाली होती. नेहा 'इंडियन आयडल-2'(2006) मध्ये जास्त पुढे जाऊ शकली नव्हती.
Audi-BMW यांसारख्या महागडया कार मेंटेन करते नेहा...
- नेहा सध्या मुंबईच्या वर्सोवा येथील 3BHK अपार्टमेंटमध्ये राहते. याची किंमत 1.2 कोटी आहे.नेहा आज बॉलिवूडच्या टॉप आणि महागड्या फीमेल सिंगर्समधून एक आहे. नेहा एका गाण्याचे 10 ते 15 लाख रुपये चार्ज करते. जर एखाद्या चित्रपट किंवा प्रोजेक्टमध्ये तिला गाणी कंपोज करण्यासाठी घेण्यात आले तर ती 2-3 लाख महिन्याचे चार्ज करते.
- नेहा जवळ स्वतःच्या 8 कार आहेत. यामध्ये Audi Q7(67.76 लाख), रेंज रोवर(49.10-64.65 लाख) आणि BMW सारख्या कारचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वी नेहाने Mercedes-Benz GLS 350 खरेदी केली आहे. या नवीन कारची किंमत 95.72 लाख आहे. नेहाच्या संपत्तीविषयी बोलायचे झाले तर ती G magazine media नुसार 51.80 कोटींची मालकिन आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.