वेदना / नेहा कक्कडसोबत ब्रेकअपच्या 14 महिन्यांनी हिमांशने तोडले मौन, म्हणाला - तिच्यामुळे मी खलनायक बनलो होतो

एक काळ असा होता की संपूर्ण जग मला सोशल मीडियावर शाप देत होता.

दिव्य मराठी वेब टीम

Feb 19,2020 04:15:20 PM IST


टीव्ही डेस्कः नेहा कक्कड आणि हिमांश कोहलीच्या ब्रेकअपला 14 महिने झाले आहेत. या विषयावर नेहा अनेक वेळा बोलली आहे, तर आता हिमांशनेही मौन मोडले आहे. त्याने आपले दुःख व्यक्त करताना नेहावर नाते तोडल्याचा आणि त्याला खलनायक केल्याचा आरोप केला आहे. "त्यावेळी बर्‍याच गोष्टी घडल्या. पण मला त्यांच्याविषयी अजिबात बोलायचे नव्हते. मला एवढेच सांगायचे आहे की तिला (नेहा) नात्यात पुढे जाण्याची इच्छा नव्हती. म्हणून आम्ही परस्पर सहमतीने विभक्त झाले. तिने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी तिचा आदर केला. पण कथेला नवीन वळण लागण्यास वेळ लागला नाही. प्रत्येक वेळी ती सोशल मीडियावर काही तरी पोस्ट करायची आणि माझ्यावर निशाणा साधायची."

संपूर्ण जग मला शाप देत होता: हिमांश


हिमांशच्या म्हणण्यानुसार, त्याच्यावर हार्टलेस प्रियकराचा टॅग लागला. लोकांनी त्याला वाईट रीतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण कुणीही त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. तो काळ आयुष्यातील अतिशय वाईट काळ असल्याचे हिमांश म्हणतो. तो पुढे म्हणाला, "आता सर्व काही ठीक आहे. पण एक काळ असा होता की संपूर्ण जग मला सोशल मीडियावर शाप देत होता."

'कोणालाही सत्य जाणून घ्यायचे नव्हते'


हिमांश म्हणाला, "कोणालाही सत्य जाणून घ्यायचे नव्हते. माझ्यावर एका रात्रीतून व्हिलनचा टॅग लागला. ते खूप वाईट होते. कारण मी काही बोलत नव्हतो आणि नेहाच्या बोलण्यावरून लोक निष्कर्षावर येत होते. ती शोमध्ये रडायची आणि लोक तिच्यावर विश्वास ठेवून माझा तिरस्कार करत होते. मलाही रडायचे होते. शेवटी मीदेखील माणूस आहे. "

'मेडिटेशनमधून मला दिलासा मिळतो'


हिमांशने कठीण काळाचा कसा सामना केला ? याविषयी तो म्हणतो, "मी लंडनला निघून गेलो. मी टॉक ऑफ द टाऊन होतो. कारण जेव्हा जेव्हा ती काही पोस्ट करायची तेव्हा लोक मला ट्रोल करायचे. प्रत्येकजण मला चुकीचा समजतोय, असं मला वाटायचं. महिलांशी बोलण्याचा माझा आत्मविश्वासही कमी झाला होता. ध्यान केल्याने मला दिलासा मिळाला. "

हिमांशला नेहाशी लग्न करायचे होते


हिमांशच्या म्हणण्यानुसार, तो नात्यात खूपच गंभीर होता आणि नेहाशी लग्न करण्याचा विचार करत होता. पण नेहाने त्याच्यावर तिचा वापर केल्याचा आरोप केल्यावर तो चक्रावून गेला. हिमांश म्हणाला, "मला एक गोष्ट वाईट वाटली ती म्हणजे नेहाने माझ्यावर तिला वापरल्याचा आरोप केला. मला काहीच समजले नाही. मी तिला भेटण्यापूर्वी चार चित्रपट केले होते आणि पैसे मिळवत होतो."

'नेहासोबत असतानाच्या काळात काम केले नाही'


हिमांश पुढे म्हणतो, "जेव्हा आम्ही दोघे एकत्र होतो तेव्हा मला जास्त काम करता आले नाही. कारण मी तिच्या सोबत तिच्या शोसाठी प्रवास करत होतोस जेणेकरून आम्ही अधिकाधिक वेळ एकत्र घालवू शकू. त्या काळात माझ्या हातून बरेचसे काम निघून गेले होते. त्यानंतर लोकांनी माझ्यावर फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली आणि सर्व काही संपले. काही महिन्यांनंतर त्याने हे सर्व स्पष्ट केले आणि सांगितले की मी कुणालाही फसवले नाही. त्यानंतर गोष्टी जुळून येत आहेत. आता मी यातून खुप पुढे निघून आलो आहे."


2017 मध्ये झाली होती पहिली भेट


हिमांशच्या म्हणण्यानुसार नेहा कक्कडसोबतची त्याची पहिली भेट 2017 मध्ये झाली होती, जेव्हा तो त्याच्या एका चित्रपटाचे प्रमोशन करत होता. दोघे चांगले मित्र बनले आणि मग ते रिलेशनशिपमध्ये आले. डिसेंबर 2018 मध्ये हिमांश आणि नेहाच्या ब्रेकअपबद्दल बरीच चर्चा झाली होती.

X