आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीकू शारदा आणि गौरव गेरा यांनी उडवली नेहा कक्करची खिल्ली, ‘देव बघतोय, तोच त्यांना शिक्षा करेल’ - नेहाचे टीकाकारांना उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः  प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी यांनी अलीकडेच कीकू शारदा आणि गौरव गेरा यांना खडे बोल सुनावले आहेत. अलीकडेच  एका विनोदी कार्यक्रमात कीकू शारदा आणि गौरव गेरा यांनी नेहाची खिल्ली उडवली होती. नेहाची उंची आणि गाणे गाताना तिचे होणारे हावभाव यावरुन दोघांनी नेहावर विनोदी टोलेबाजी केली. दो पैग मार या नेहाच्या गाण्याचा वापरदेखील या व्हिडिओत करण्यात आला. यावरुन नेहाने इंस्टा स्टोरीच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिले, “मी अशा नकारात्मक वातावरणात जगू शकत नाही. परंतु माझ्यासोबत घडलेला तो प्रकार आता मी विसरले आहे. त्या कार्यक्रमात माझ्यावर केले गेलेले विनोद पाहून त्यावेळी मला खुप राग आला होता. परंतु आता मी ती घटना विसरण्याचा प्रयत्न करत आहे." 

माझ्या नावाचा वापर करणे बंद करा - नेहा  
“माझ्या चाहत्यांना विनंती आहे की तुम्ही देखील हे विसरुन जा. कारण देव सगळं बघत आहे. देवच त्यांना शिक्षा करेल. माझ्या नावाचा वापर करणे बंद करा. जर तुम्हाला माझ्या गाण्यांचा तिरस्कार करत असाल, तर माझ्या गाण्यांवर एन्जॉय करणे, डान्स किंवा अभिनय करणे बंद करा.” अशा शब्दात नेहाने आपली नाराजी व्यक्त केली.

नेहा पुढे म्हणते, "माझी गाण्यांवर पार्टी करता. आपल्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडला माझी गाणी ऐकवता. त्यानंतर एवढ्या वाईट शब्दांत माझ्याविषयी लिहिता. लाज वाटत नाही का तुम्हाला? आपण कलाकारांचे आभार व्यक्त करायला हवे, त्यांच्यामुळे आनंदी होता. मग असे का करता? त्रास झाला मला. पण दुसरीकडे मी आपल्या  #Nehearts (फॅन्स) आणि समर्थकांची आभारी आहे." 

नेहा या नोटच्या कॅप्शनमध्ये लिहिले, मी भाग्यभाली आहे की, माझ्याजवळ एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्यासारखे लोक आहेत. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यावर प्रेम करेल, तुमचा सन्मान करेले.  #Nehearts आणि  #NehuHappyNeHeartsHappy एवढा सुंदर हॅशटॅग बनवण्यासाठी धन्यवाद."

बातम्या आणखी आहेत...