आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शार्दुलची तिसरी पत्नी आहे नेहा पेंडसे, बिनधास्तपणे म्हणाली..., 'मीसुद्धा व्हर्जिन नाही'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठीसोबत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री नेहा पेेंडसे 5 जानेवारी रोजी शार्दुल सिंग बयाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली. खास गोष्ट म्हणजे नेहाचे हे पहिले तर शार्दुलचे हे तिसरे लग्न आहे. शार्दुलचा यापूर्वी दोनदा घटस्फोट झाला असून त्याला दोन मुलीदेखील आहेत. नेहा बोरा हे शार्दुलच्या पहिल्या पत्नीचे तर अनिता अग्रवाल हे दुस-या पत्नीचे नाव आहे. आलिया आणि रिया या त्याच्या दोन मुली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नेहा शार्दुलच्या दोन लग्नांविषयी बेधडकपणे बोलली. शार्दुलच्या तिसऱ्या लग्नाचा लोकांना इतका त्रास का होतोय, असाही सवाल तिने विचारला.

नेहा पुढे म्हणाली की, लोक फक्त शार्दुलच्या घटस्फोटांविषयी का बोलत आहेत? मीसुद्धा काही व्हर्जिन नाही. उलट शार्दुलने त्याचे प्रेम असलेल्या व्यक्तींशी लग्न तरी केलं. माझ्याबाबतीत तर लग्नाआधीच मुलांनी नातं मोडले. कमीत कमी शार्दूलने कमिटमेंट तरी दिली होती, असा टोला नेहाने टीकाकारांना लगावला.

बातम्या आणखी आहेत...