आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या नेहा पेंडसेच्या लग्नविधींना सुरुवात, गृहमुख पूजा करताना दिसले कुटुंबीय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक नेहा पेंडसे ही लवकरच बोहल्यावर चढणार असून तिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नापूर्वी केल्या जाणा-या  गृहमुख पूजेची छायाचित्रे शेअर केली आहेत. शार्दुल सिंग बियाससोबत नेहा लग्नगाठीत अडकणार आहे.  येत्या  5 जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने हे लग्न होणार आहे.

राजकीय कुटुंबातून आहे शार्दुल : नेहाचा भावी पती शार्दुल हा महाराष्ट्रातील एका राजकीय कुटुंबातील आहेत. नेहाने इंस्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. नेहाच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचे म्हणजे ती 'जून' या आगामी मराठी चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मेननसोबत झळकणार आहे.