आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Neighbors Murdered Mother And Daughter, As They Think That They Are Doing Black Magic In Jharkhand

माय-लेक चेटकीन असल्याचे सांगत शेजाऱ्यांनी घेतला जीव, मुलीवर बलात्कार झाला असल्याचा पोलिसांना संशय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनुआ(झारखंड)- चेटकीन असल्याच्या अंधश्रद्थेत शेजाऱ्यांनी माय-लेकिला आधी लाठ्यांनी मारहाणी केली नंतर चाकून हे हात आणि मानेवर वार करून हत्या केली. यावेळी घरातील बाप-लेकाने कसे-बसे पळ काढत आपला जीव वाचवला. मुलीवर बलात्कार झाल्याचाही पोलिसांना संशय आहे. प्रकरण पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील अती-नक्षली भागातील गुदडी पोलिस ठाणे हद्दीतील रोवाउली गावतील आहे.


घटनेच्या 24 तासानंतर गुरुवारी संध्याकाळी गुदडी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन वडील-मुलाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. शुक्रवारी चक्रधरपूर डी.एस.पी. आनंद मोहन सिंह आणि पोलिस अधिक्षक मनोज कुमार गुप्ता यांनी कुटुंबीयांकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपींविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.


घरी परत जाण्यासही घाबरत आहेत
घरातील दोन जणांच्या हत्येनंतर सुभाष खंडाइत आणि त्याचे कुटुंबीय इतके भयभीत झालेत की, त्यांना घरी जाण्यासही भीती वाटत आहे. सोनुआ पोलिस स्टेशलमध्ये सुभाषने सांगितले- "मी घरी गेलो तर मलाही मारून टाकतील." हल्लेखोरांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना मारून टाकण्याची धमकी दिली आहे. ते आपली पत्नी आणि मुलीचा अंत्यविधीही आपल्या नातलगाच्या गावात करणार आहेत.


अंधश्रद्धेमुळे गेला जीव
सुभाष खंडाइतने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेजारील लोकांचा मृत्यू झाला होता. सुभाषचे कुटुंबीय मागील 3-4 वर्षांपासून देवी मनसाची पुजा करत आहेत. सोमवारी शेजारी राहणाऱ्या रामबिलासची पत्नी नाचत त्यांच्या घरात आली आणि देवी मनसासमोर बसली. हल्ला करणाऱ्या लोकांच्या घरात मागच्या वर्षी दोन-तीन जणांचा मृत्यू झाला होता आणि यासाठी ते सुभाषच्या कुटुंबीयांना जबाबदार ठरवत होते.


सुभाषने सांगितल्यानुसार हल्लेखोरांनी चेटकीन असल्याचा आरोप लावत हल्ला केला. पोलिसांनी सांगितले की, सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल.