आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत Good-Bad टचची माहिती दिल्यावर ढसाढसा रडली चिमुरडी, म्हणाली- अंकलसुद्धा माझ्यासोबत असेच करतात, शेजाऱ्याला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतियाळा - तिचे वय फक्त 9 वर्षे आहे. तिला चांगल्या-वाईटाची समज नाही. बुधवारी शाळेत नौजवान संगठन सेवा समिती गुड-बॅड टच समजण्यासाठी जेव्हा चित्रपट दाखवत होते, तेव्हा चिमुरडी ढसाढसा रडू लागली. तिचे रडण्याचे कारण तेथे बसलेल्यांना लवकर लक्षात आले नाही. सोबतची मुले तिला गप्प बसवत होती, तेवढ्यात एनजीओ प्रमुख ज्योति तिवारी यांची नजर चिमुरडीवर गेली.

 

तिला विश्वासात घेतल्यानंतर चिमुरडीने सर्व सांगितले. म्हणाली की, शेजारचे काका नेहमी तिच्या अंगांना अशाप्रकारे स्पर्श करतात. ते ऐकताच तेथे उपस्थित लोकं भावुक झाले. त्यांनी कशीबशी तिची समजूत घालून तिला शांत केले. यानंतर तिच्या कुटुंबीयांना संपर्क करण्यात आला. यानंतर आरोपी शेजाऱ्याविरुद्ध एनजीओने मुलीला व कुटुंबाला घेऊन पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनीही लगेच अॅक्शन घेत चिमुरडीला राजिंदरा रुग्णालयात दाखल करून 35 वर्षीय आरोपी शेजाऱ्याला अटक करून गुन्हा दाखल केला.

 

शेजाऱ्याचे कृत्य चिमुरडीच्या तोंडून... 
मी जेव्हा छतावर खेळायला जायचे तेव्हा आमचे शेजारी भाडेकरू अंकल मला जवळ बोलवायचे. मग काही बोलल्यानंतर ते बहाण्याने त्यांच्या खोलीत न्यायचे. तेथे जाऊन माझ्यावर प्रेम करू लागायचे. ते नेहमी माझ्या प्रायव्हेट पार्ट्सनाही स्पर्श करायचे. चित्रपट पाहिल्यानंतर मला कळले की, हे किती घाणेरडे आहे. दुसरीकडे, या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, ते पेंटर आहेत आणि सकाळी 8 वाजताच कामासाठी घराबाहेर पडतात. रात्री उशिरा घरी येतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि 3 मुले आहेत. 2 मुले आणि ही एकुलती एक लेक आहे. आजपर्यंत मुलीने आम्हाला या घटनेबद्दल सांगितले नव्हते, बहुधा तिला कळत नसेल की तिच्यासोबत काय होत आहे?

 

2 मुलांचा बाप आहे आरोपी:
पीडित कुटुंबाने सांगितले की, आरोपी मोतीलाल त्यांच्या इमारतीत 7 वर्षांपासून राहतोय. त्याला एक मुलगा आणि एक मुलगीही आहे. आरोपी पराठ्यांची हातगाडी लावतो.

 

आरोपीला अटक, कोर्टात करणार हजर:
पोलिस स्टेशन इंचार्ज राहुल कौशल म्हणाले की, अल्पवयीन चिमुरडीवर रेपच्या आरोपी शेजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्याला कोर्टापुढे हजर करून चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली जाईल.  

 

 

बातम्या आणखी आहेत...