आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक खराब राहू लागली मुलाची तब्येत, डॉक्टरांना दाखवल्यानंतर मिळाले असे उत्तर की तीन महिन्यांपूर्वी आला ख्रिसमस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनसिनाटी - सामान्यतः संपूर्ण जगात 25 डिसेंबरला ख्रिसमस उत्सव साजरा केला जातो. परंतु अमेरिकेतील सिनसिनाटी शहरातील कॉलेरीन भागात तीन महिन्यांपूर्वीच ख्रिसमस आला आहे. याचे कारण 2 वर्षांचा एक मुलगा ब्रॉडी एलन आहे. डॉक्टरांनी त्याला ब्रेन कँसर असल्याचे सांगितले असून तो फक्त 2 महिनेच जगेल असे सांगितले आहे. ब्रॉडीची शेवटची इच्छा सांताक्लॉज पाहण्याची आहे. यामुळे या भागातील सर्व लोक ब्रॉडीला ख्रिसमस उत्सव सुरु झाल्यासारखे भासवत आहेत.


चक्कर येऊन पडत होता ब्रॉडी 
- काही महिन्यांपूर्वी ब्रॉडीची तब्येत अचानक बिघडली. तो वारंवार चक्कर येऊन पडत होता. कुटुंबीयांनी त्याला डॉक्टरकडे नेल्यानंतर त्याला ब्रेन कँसर असल्याचे समजले. कमी वयामध्ये रेडिएशनच्या त्रासामुळे डॉक्टरांनी त्यावर उपचार सुरु केला नाही. या दरम्यान ब्रॉडीचा ट्युमर 30 टक्क्यांनी वाढला. कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रॉडीचे उपचार बंद केले. आता कुटुंबीय ब्रॉडीला फक्त आनंदी ठेवण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहेत.
- डॉक्टरांनी ब्रॉडीकडे फक्त दोन महिने शिल्लक असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. ब्रॉडीचे वडील टॉड एलन सांगतात की- 'ब्रॉडी सध्या 2 वर्षांचा असून त्याला ख्रिसमस विषयी सर्वकाही माहित आहे. या उत्सवामध्ये त्याला खेळायला, गिफ्ट घ्यायला खूप मजा येते. या वर्षीसुद्धा तो ख्रिसमसची वाट पाहत आहे. ख्रिसमस आणखी 3 महिन्यांनी आहे आणि ब्रॉडीकडे जास्त वेळ नसल्यामुळे आम्ही 3 महिन्यांपूर्वीच हा उत्सव साजरा करत आहोत. उत्सवापूर्वी आम्हाला ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचा ड्रेस आणि इतर सामानाची जमवाजमव करणे अवघड जात आहे.'


संपूर्ण शहर या मुलासाठी झाले तयार 
- शहरातील लोकांना तयार करण्यासाठी ब्रॉडीच्या कुटुंबीयांनी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी मुलाच्या आजराविषयी माहिती देत लोकांकडे मदतीची विनंती केली. पोस्ट व्हायरल होताच या भागातील सर्व लोकांनी ब्रॉडीसोबत ख्रिसमस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या लोकांनीच ख्रिसमस ट्रीपासून ते खेळण्यांपर्यंत सर्वकाही व्यवस्था केली.
- या भागातील लोकांनी ब्रॉडीच्या आनंदासाठी 23 सप्टेंबरला एक छोटीशी परेड काढण्याचाही निर्णय घेतला आहे. यामध्ये सांताक्लॉज, त्यांची रोलर गाडी आणि सुपरहिरोचा ड्रेस परिधान केलेल्या लोकांना दाखवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...