आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावर पहिले पाऊल ठेवणाऱ्या नील आर्मस्ट्राँग यांनी इंदिरा गांधीची मागितली होती माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली-  आज अपोलो-11 स्पेस मिशनला 50 वर्षे पूर्ण झाली आहे, त्यानिमीत्ताने गूगलने आज खास डूडल ठेवून मिशन अपोलो-11ला समर्पित केले आहे. हे मिशन दोन जणांना सुरक्षितरित्या चंद्रावर पाठवणे आणि परत घेऊन येण्याबाबत होते. गूगलने आपल्या डूडलमध्ये नील आर्मस्ट्राँगला चंद्रावर पाऊल ठेवताना दाखवले आहे. त्याला क्लिक करताच व्हिडिओ सुरू होतो, त्यात संपूर्ण मिशनचा व्हिडिओ दाखवला जातो.

 

मिशन अपोलो-11 ला 16 जुलै 1969 ला कॅनेडी स्पेस सेंटर लॉन्च कॉम्प्लेक्स 39-ए मधून सकाळी 8:32 वाजता लॉन्च केले होते. नील आर्मस्ट्रॉंगने 20 जुलैला चंद्रावर पाऊल ठेवले होते. ज्याला पाहण्यासाठी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सकाळी 4.30 पर्यंत जागल्या होत्या आणि जेव्हा आर्मस्ट्रॉँगला याबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्याने त्यांची माफी मागितली.. 

 

माजी परराष्ट्रमंत्री नटवर सिंह यांनी हा किस्सा सांगितला होता. त्यांनी सांगितले होते की, चंद्रावरून पृथ्वीवर परतल्यानंतर नील आर्मस्ट्राँग आपल्या साथीदारासोबत जग भ्रमंती दरम्यान नवी दिल्लीत इंदिरा गांधींची भेट घेतली, तेव्हा नटवर सिंह उपस्थित होते. तिथे नटवर सिंह यांनी नील आर्मस्ट्राँग यांना इंदिरा गांधी सकाळी 4.30 पर्यंत जागल्याचे सांगितले.


तेव्हा नील आर्मस्ट्राँग यांननी इंदिरा गांधींना झालेल्या असुविधेबद्दल खेद व्यक्त केला होता. तसेच पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला जास्त जागावे लागणार नाही, अशा वेळेस चंद्रावर जाउ असे सांगितले. मानवजातीच्या इतिहासात 20 जुलै, 1969 चा दिवस सुवर्ण अक्षरात लिहीला गेला आहे. 

बातम्या आणखी आहेत...