आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

First Pic:सलमानच्या ऑनस्क्रीन भावाने दाखवली 3 दिवसांच्या मुलीची पहिली झलक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: डॉटर्स डे (23 सप्टेंबर)ला बॉलिवूड अॅक्टर नील नितिन मुकेशने आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. या दरम्यान नीलच्या कडेवर मुलगी दिसतेय, तसेच सोबत पत्नी देखील आहे. पत्नी रुक्मिणी सहायने 3 दिवसांपुर्वी गुरुवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. यापुर्वी एप्रिलमध्ये नील नितिन मुकेशने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली होती. 

 

19 महिन्यांपुर्वी झाले होते नील-रुक्मिणीचे लग्न 
- नील नितिन मुकेश आणि रुक्मिणी सहायचे लग्न गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाले होते. नीलने सलमान खानसोबत प्रेम रतन धन पायोमध्ये त्याच्या भावाची भूमिका साकारली होती.
- रुक्मिणीचे बेबी शॉवर याच वर्षी जूनमध्ये झाले होते. या दरम्यान नीलचे वडील प्रसिध्द सिंगर नितिन मुकेशने सुनेसोबतचा क्यूट फोटो शेअर केला होता.

 

या चित्रपटांमध्ये नीलने केले काम 
लींजेड्री सिंगर मुकेश यांचा नातू आणि अॅक्टर नील शेवटच्यावेळी 'गोलमाल अगेन'मध्ये दिसला होता. यासोबतच 'जॉनी गद्दार' ( 2007), 'न्यूयॉर्क' (2009), '7 खून माफ' (2011), 'प्लेयर्स' (2012), 'प्रेम रतन धन पायो' (2015), 'वजीर' (2016), 'इंदु सरकार' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा आगामी चित्रपट 'साहो' आणि 'फिरकी' आहे. हे याचवर्षी रिलीज होतील.

बातम्या आणखी आहेत...