आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News: शाहिद कपूरनंतर अजून एक बॉलिवूड अॅक्टर झाला बाबा, पत्नीने दिला मुलाला जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: शाहिद कपूरनंतर अॅक्टर नील नितिन मुकेशही बाबा झाला आहे. पत्नी रुक्मिणी सहायने गुरुवारी दुपारी मुलीला जन्म दिला. कुटूंबाच्या जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुक्मिणीने मुंबईच्या बीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. एप्रिलमध्ये नील नितिन मुकेशने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याने तो बाबा होणार असल्याची गोड बातमी शेअर केली होती. त्याने लिहिले होते की, 'Now we will be THREE 👶🏼'. तर काही महिन्यांपुर्वी तो एका मुलाखतीत म्हणाला होता की, 'तो आयुष्याच्या दूस-या फेसमध्ये पाऊल ठेवणार आहे, यामुळे तो खुप आनंदी आहे. मुलगा असो किंवा मुलगी काहीच फरक पडत नाही, जे होईल ते हेल्दी व्हायला हवे.'

 

19 महिन्यांपुर्वी झाले होते नील-रुक्मिणीचे लग्न 
- नील नितिन मुकेश आणि रुक्मिणी सहायचे लग्न गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झाले होते. नीलने सलमान खानसोबत प्रेम रतन धन पायोमध्ये त्याच्या भावाची भूमिका साकारली होती.
- रुक्मिणीचे बेबी शॉवर याच वर्षी जूनमध्ये झाले होते. या दरम्यान नीलचे वडील प्रसिध्द सिंगर नितिन मुकेशने सुनेसोबतचा क्यूट फोटो शेअर केला होता. 

 

या चित्रपटांमध्ये नीलने केले काम 
लींजेड्री सिंगर मुकेश यांचा नातू आणि अॅक्टर नील शेवटच्यावेळी 'गोलमाल अगेन'मध्ये दिसला होता. यासोबतच 'जॉनी गद्दार' ( 2007), 'न्यूयॉर्क' (2009), '7 खून माफ' (2011), 'प्लेयर्स' (2012), 'प्रेम रतन धन पायो' (2015), 'वजीर' (2016), 'इंदु सरकार' (2017) सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा आगामी चित्रपट 'साहो' आणि 'फिरकी' आहे. हे याचवर्षी रिलीज होतील. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...