आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेस्लेच्या मिनरल वाॅटर प्रकल्प उभारणीस स्थगिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेस्ले या कंपनीचा पाण्याचा बाॅटलिंग प्लँट उभारण्याचा प्रकल्प अत्यावश्यक सेवा गृहीत धरण्यास नकार देत या प्रकल्प उभारणीस मिशिगन (अमेरिका) न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ज्या स्थानिक प्रशासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली त्या व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा नियम आणि कायदेशीर तरतुदींचे अवलाेकन करावे, अशी सूचना केली. नेस्ले कंपनीला दिल्या जात असलेल्या सवलतींचा विचार करता काेणत्या दृष्टिकाेनातून हा प्रकल्प लाेकहितासाठी उभारला जात आहे, असा प्रश्न पडताे. हा प्रकल्प तर व्यावसायिक स्वरूपाचा आहे. इतकेच नव्हे तर टाउनशिपच्या नियमांची पायमल्लीदेखील या प्रकल्पामुळे हाेत आहे, याशिवाय उल्लेखनीय बाब म्हणजे पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे खासगीकरण कसे करता येऊ शकते? काेर्टाची ही टिप्पणी म्हणजे नेस्लेच्या मनसुब्याला बसलेला जाेरदार दणका मानला जात आहे. मिशिगनमधील ओसिओला या लहानशा शहरात नेस्ले कंपनी 'आइस माउंटेन वाॅटर' या ब्रँड नावाने मिनरल वाॅटर प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी इमारत आणि पंपिंग स्टेशन उभारणीसाठी टाउनशिपच्या साऱ्या नियमांची पायमल्ली हाेत असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाकडे ओसिओलाचे रहिवासी आपला विजय मानत आहेत. जगभरात दिग्गज मानली जाणारी आणि सर्वात जुनी अशी नेस्ले कंपनी नियमांचे उल्लंघन करून उभारत असलेल्या प्रकल्पास एका लहानशा शहरातील न्यायालयाने स्थगिती दिल्याचा संदेश जगभर व्हायरल हाेत आहे. नेस्लेची या माध्यमातून बदनामी हाेत आहे. जगभरात या ब्रँडच्या नावाने पाणी विकण्याची घाई नेस्लेला झाली हाेती. मिशिगनच्या पर्यावरण विभागाचे अॅटर्नी जिम ओल्सन हेदेखील यापूर्वी नेस्ले कंपनीच्या विरुद्ध लढा देत हाेते. न्यायालयाचा निकाल हा जमीन, पाण्याचे स्रोत अाणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने याेग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.