आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट मीटरिंगच्या ऊर्जा प्रकल्पास 25 टक्के सवलत, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - लाँड्री व्यवसायासह १ ते २० किलोवॅट सौर ऊर्जेच्या नेट मीटरिंग प्रकल्पास महाऊर्जातर्फे २५ टक्के सवलत देण्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

महाऊर्जा नियामक मंडळाच्या बैठकीतही १ ते २० किलोवॅट सौर ऊर्जेच्या नेट मीटरिंग प्रकल्पास २५ टक्के सवलतीचा ठराव घेऊन त्यास बावनकुळे यांनी लगेच मंजुरी दिली. बालगंधर्व रंगमंदिरात पुणे जिल्हा लाँड्री व्यावसायिकांकडून ऊर्जामंत्री यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
 
बावनकुळे म्हणाले, १ ते २० किलोवॅट वीज नेटमीटरिंगद्वारे वापरणारे धोबी, मत्स्य व्यावसायिक, पशुसंवर्धनाचे प्रकल्प, महिला बचत गटाचे लघु उद्योग, लघु प्रकल्प, पीठ गिरण्या अशा व्यावसायिकांसाठी ही २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. मुद्रा बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्या लघुउद्योगांचाही यात समावेश असेल. ही सवलत देण्यामुळे रोजगार निर्मितीवर भर दिला जाईल. या संदर्भात सविस्तर ठराव महाऊर्जाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...