आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटची ५० वर्षे : स्ट्रॉबेरीएवढे आहे नेटचे वजन, माणसापेक्षा जास्त रोबोट युजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्य मराठी विशेष - ७ एप्रिल १९६९ ला अमेरिकेच्या लष्कराच्या एका योजनेच्या रूपात इंटरनेटचा जन्म झाला होता. इंटरनेटशी संबंधित रंजक गोष्टी, नोंदी आणि एक कथा, ज्यात हॅकिंगमुळे खळबळ उडाली होती.  
 

एका स्ट्रॉबेरीएवढे आहे पूर्ण इंटरनेटचे वजन  

व्हिसॉस या प्रख्यात यूट्यूब चॅनलने सांगितले की, जगात एकूण इंटरनेटचे वजन सुमारे ५० ग्रॅम आहे, ते एका स्ट्रॉबेरीएवढे आहे. हे वजन सर्व इलेक्ट्रॉनचे असते, जे कोणत्याही वेळी मोशनमध्ये असतात. ही गणना गणित आणि भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार आहे.  
 

डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूचा शोध; मागितली माफी  

डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू म्हणजे वर्ल्ड वाइड वेबचा शोध लावणारे वैज्ञानिक टिम बर्नर्स ली यांनी वेब पत्त्यात येणाऱ्या डबल स्लॅश (//) साठी माफी मागितली होती. २००९ मध्ये त्यांनी म्हटले की, स्लॅशशिवायही वेब अॅड्रेस सहजपणे बनू शकला असता. त्यामुळे लोकांना अडचण होते.  
 

मानवापेक्षा इंटरनेटचा जास्त वापर रोबोटकडून 

इंपरवा या सिक्युरिटी फर्मच्या गेल्या वर्षातील ‘बोट ट्रॅफिक रिपोर्ट २०१६’ या अहवालातील माहितीनुसार जगातील एकूण वेब ट्रॅफिकमध्ये ५२% भागीदारी बोट्स किंवा ऑटोमेटेड टास्कच्या प्रोग्रामसाठी असते. मानव फक्त ४८% इंटरनेटचाच वापर करतो.  
 

 

इंटरनेटवर आपण जे काम करतो त्याचे हे विक्रम (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार)  

> जगातील पहिली बेवसाइट  http://info.cern.ch/ ६ ऑगस्ट १९९१ ला लाँच झाली होती.  
> ऑनलाइन मित्र बनवण्यात मलेशियाचे लोक सर्वात पुढे आहेत. तेथील एका युजरचे सरासरी २३३ डिजिटल फ्रेंड्स.  
> भारतीय गुरू राजेंद्रजी महाराज यांच्या फेसबुक पेजवर एका आयटमसाठी सर्वाधिक कमेंट्सचा विक्रम आहे. १६ मे २०१३ पर्यंत १,८६,९७,६१४ कमेंट मिळाल्या. कमेंटमध्ये ‘राम’ लिहायचे होते.  
> अमेरिकी उद्योगपती मार्क क्युबन यांनी ऑक्टोबर १९९९ मध्ये ऑनलाइन बिझनेस जेट खरेदी केले. किंमत ४० दशलक्ष डॉलर. ही सर्वात मोठी ऑनलाइन खरेदी. 

 

... आणि एक रंजक कहाणी इंटरनेट जगतातील पहिले हॅकर्स  
१२ ऑक्टोबर १९८३। घाबरलेल्या ख्रिसने बिल लॅनड्रेथ नावाच्या एका मुलाला अचानक डेट्रॉइटला (अमेरिका) बोलावले. ख्रिसने खूप थोडक्यात चर्चा करून सांगितले-‘आता मला कॉल करू नको. एफबीआयने माझ्या घरावर छापा टाकला आहे.’ बिल घाबरला. त्याला माहीत होते की, जर एफबीआय ख्रिसच्या घरी आली आहे म्हणजे पुढचा नंबर आपलाच आहे. दुसऱ्या दिवशी सुमारे डझनभर एफबीआय अधिकाऱ्यांनी बिलच्या वडिलांच्या घरी (सॅनदिएगो) छापा टाकला. तेथे त्यांना हॅकिंगचे पुरावे मिळाले आणि बिलच्या बहिणीच्या बेडखाली लपवलेले एक कॉम्प्युटर मिळाले. चौकशीत समजले की, १८ वर्षीय बिल आणि १४ वर्षीय ख्रिस हे हॅकिंगचा एक गट चालवतात, त्याचे नाव ‘द इनर सर्कल’ आहे. एकाच दिवसात एफबीआयने ९ राज्यांत छापा टाकून हॅकर्सना अटक केली आणि कॉम्प्युटर, मॉडेल, हाताने लिहिलेले कोड जप्त केले. द इनर सर्कल समूहात सुमारे १५ तरुण होते. त्यांनी जीटीई टेलीमेलपासून अरपानेटचे नेटवर्कही हॅक केले होते. जीटीई टेलीमेल नासा, कोकाकोला, सिटी बँक या कंपन्यांसाठी ई-मेल होस्ट करत होती, तर अरपानेटचा वापर संशोधक आणि लष्कराचे लोक करत होते. याच वेळी ४१४ एस नावाचाही एक हॅकिंग ग्रुप पकडला गेला. त्यानंतर १९८४ मध्ये हॅकिंग प्रतिबंधक कायदा तयार झाला. 

बातम्या आणखी आहेत...