आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 वर्षांच्या करिअरमध्ये अभिषेक बच्चनने दिले फक्त 6 हिट चित्रपट, तरीही कोट्यावधी प्रॉपर्टीचा आहे मालक, 40 कोटींच्या आलीशान घरासोबतच आहेत 6 कोटींच्या लग्जरी कार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिषेक बच्चन 43 वर्षांचा झाला आहे. 5 फेब्रुवारी, 1976 मध्ये मुंबईत त्याचा जन्म झाला. 2000 मध्ये त्याने रिफ्यूजी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत अभिषेकने 60 चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिषेकच्या यशस्वी चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्याच्या 19 वर्षांच्या दिर्घ करिअरमध्ये निवडक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. तरीही अभिषेक कोट्यावधींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. वेबसाइट नेटवर्दियरनुसार अभिषेक सध्या एका चित्रपटासाठी 3 ते 5 कोटी रुपये चार्ज करतो. यासोबतच जवळपास 30 मिलियन डॉलरच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. 


चित्रपटांसोबतच या सोर्सेजने करतो कमाई
अभिषेक बच्चन चित्रपटांसोबतच अनेक दूस-या सोर्सेजने तगडी कमाई करतो. त्याच्याजवळ प्रो-कब्बडी लीग टीम जयपुर पिंक पँथर्स आहे. यासोबतच अभिषेक इंडियन सुपरलीगची फुटबॉल टीम 'चेन्नइयन एफसी'चा मालक आहे. 2014 मध्ये जयपुर पिंक पँथर्स विजेती ठरली होती. तर 'चेन्नइयन एफसी' 2015 आणि 2018 मध्ये फायनल जिंकण्यात यशस्वी ठरली होती. 

 

ब्रांड एंडोर्समेंटमधून चांगली कमाई करतो अभिषेक 
अभिषेकजवळ अनेक ब्रांड्सच्या जाहिराती आहेत. यामधून तो चांगली कमाई करतो. अभिषेक एलजी, मोटोरोला, आयडिया मोबाइल आणि व्हिडिओकॉनसारक्या कंपन्यांचा ब्रांड एम्बेसडरही राहिला आहे. अभिषेक जाहिरातींमधून एका वर्षाला अंदाजे 1 कोटींची कमाई करतो. 

 

6 कोटींच्या लग्जरी कारचा मालक आहे अभिषेक 
अभिषेक बच्चनला कारचा शौक आहे. त्याच्याजवळ ऑडी A8L, मर्सिडीज-बेंज एस-क्लास S350d, मर्सिडीज-बेंज एस-क्लास S500, मर्सिडीज-बेंज GL63 AMG, बेंटले कॉन्टिनेंटल GT आणि जगुआरसारख्या लग्जरी कार आहेत. या कारच्या किंमत जवळपास 6 कोटींच्या जवळपास आहे. 

 

अभिषेक बच्चनजवळ 40 कोटींचे घर 
अभिषेकजवळ मुंबईमध्ये रियल एस्टेट प्रॉपर्टी आहे. त्याने 2011 मध्ये खरेदी केले होते. अभिषेकच्या या घराची किंमत जवळपास 40 कोटी आहे. 3875 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले त्याचे घर स्कायलार्क टॉवर्सच्या 37 व्या मजल्यावर आहे. यामध्ये 5 बेडरुम, फॅमिली रुम, डायनिंग एरिया आणि प्रत्येक साइडला 20 फूटांचे टेरेस आहे.  finapp.co.in वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, अभिषेकने जवळपास 132 कोटींचे पर्सनल इन्वेस्टमेंट केले आहे. 

 

अभिषेकपेक्षा जास्त श्रीमंत आहे ऐश्वर्या 
अभिषेक कोट्यावधी प्रॉपर्टीचा मालक असला तरीही त्याच्या पत्नीच्या तुलनेत तो मागेच आहे. नेटवर्दियरच्या रिपोर्टनुसार, एश्वर्याची जवळपास 35 मिलियन डॉलर म्हणजेच 245 कोटींची प्रॉपर्टी आहे. ऐश्वर्या बच्चनच्या कमाईचे माध्यम चित्रपट आहेच. यासोबतच ती कमर्शियल जाहिरातींमधून तगडी कमाई करते. एश्वर्या एका जाहिरातीसाठी 4-5 कोटी रुपये घेते. यासोबतच ऐश्वर्याची पर्सनल एन्वेस्टमेंट 182 कोटींच्या जवळपास आहे. ऐश्वर्याजवळ चार लग्जरी कार आहेत, याची किंमत 6.2 कोटी आहे. यासोबतच ऐश्वर्या राय अनेक कंपन्याची शेअर होल्डरही आहे. 

बातम्या आणखी आहेत...