आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीयुष गोयल पत्नीपेक्षा गरीब..पत्नीची 50 कोटीची मालमत्ता तरी जवळ ठेवतात केवळ 1222 रूपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींची सरकारच्या कार्यकाळातील अंतिम बजेट शुक्रवारी (ता.1) संसदेत सादर करण्‍यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अनुपस्थितीत अर्थमंत्रिपदाची धुरा पीयुष गोयल यांनी सांभाळली.

 

या अनुषंगाने आम्ही आपल्याला पीयुष गोयल यांच्या खासगी आयुष्याबद्द रंजक माहिती घेऊन आलो आहे. तुम्हाला हे वाचून आश्चर्याचा धक्का बसेल, मालमत्तेच्या बाबतीत सांगायचे तर पीयुष गोयल यांची पत्नी सीमा गोयल या एक पाऊल पुढे आहेत. पीयुष गोयल यांच्याकडे 25 कोटींची मालमत्ता आहे. मात्र, सीमा यांच्याकडे 50 कोटींची अर्थात पतीपेक्षा दुप्पट मालमत्ता आहे. विशेष म्हणजे पतीपेक्षा धनाढ्य असलेल्या सीमा या स्वत:कडे केवळ 1222 रूपये रोख रक्कम ठेवतात.


अर्थमंत्र्यांपेक्षा श्रीमंत आहे पत्नी...
- पीयुष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या तपशिलानुसार, त्यांच्या कुटुंबाची एकूण मालमत्ता 95 कोटी रूपये आहे. त्यांच्यावर असलेल्या 11 कोटी रुपयांच्या कर्जाचा देखील यात उल्लेख आहे.

- पीयुष गोयल यांच्याकडे असलेल्या रोख रकमेबाबत सांगायचे झाल्यास, त्यांच्याकडे 3 लाख रोख आहे. परंतु सीमा गोयल या स्वत: जवळ केवळ 1222 रूपये रोख स्वरूपात आहेत.

- सीमा गोयल या पतीपेक्षा नक्कीच श्रीमंत आहे. गोयल यांच्याकडे एकूण 25 कोटी 25 लाख 95 हजार 223 रूपयांची मालमत्ता आहे, तर सीमा या 50 कोटी 57 लाख 75 हजार रूपयांच्या मालमत्तेच्या मालक आहे.

- गोयल यांच्याकडे 2 कोटी 3 लाख 54 हजारांचे सोने-चांदीचे दागिने आणि घड्याळे आहेत, तर त्यांच्या पत्नीकडे 1 कोटी 76 लाख 80 हजार रूपयांचे सोने-चांदीचे दागिने आहेत.
 - गोयल यांनी 6 कोटी 36 लाख 54 हजार रूपये तर सीमा यांनी 37 लाख 9 हजार शेअर बाजारात गुंतवले आहेत.

 

पुढे वाचा...वडिलांकडून वारसाहक्कात मिळाले राजकारण

 

बातम्या आणखी आहेत...