आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Netaji Subhash Chandra Bose's Two Soldiers Carry The Badge Of The Azad Hind Sena For 70 Years.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे दोन सैनिक, 70 वर्षांपासून छातीवर आजाद हिंद सेनेचा बॅज लावून फिरतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 123 वी जयंती आहे, हा वी रथिनवेलु आणि वी अंगुसामीसाठी खास दिवस आहे

चेन्नई- नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज 123 वी जयंती आहे. देशभरातील लोक आजच्या दिवशी सुभाष चंद्र बोस यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. पण, आजचा दिवस दोन व्यक्तींसाठी खूप खास आहे. या दोघांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या नेतृत्वात आझाद हिंद सेनेत लढाई लढली होती. मागील 70 वर्षांपासून नेताजींच्या आझाद हिंद सेनेचे देशात अस्तित्व नसले तरी हे दोन सैनिक आजही आझाद हिंद सेनेचा बॅज छातीवर लावून मिरवतात.
चेन्नईच्या कोरुक्कुपेटमध्ये राहणारे 96 वर्षीय वी रथिनवेलु आणि 91 वर्षीय वी अंगुसामी यांनी द्वितीय महायुद्धात डाला, रंगून, इम्फाल आणि कोहिमामध्ये इंग्रजांविरुद्ध लढाई लढली होती. आजही त्यांच्या घरावर सुभाष चंद्र बोस यांच्यासोबतचा फोटो आणि आझाद हिंद सेनेचे प्रमाणपत्र लावले आहे.वी रथिनवेलु सांगतात, 1943 मध्ये रंगून (आता यंगून) मध्ये एक सभा झाली होती. त्या सभेत जवळपास 1 लाख लोक नेतांजींना भेटायला आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळून देणे, हाच त्या सर्वांचा हेतू होता. त्या वेळेस आमची पहिल्यांदा नेताजींशी भेट झाली होती. त्यांच्या भाषणात देशभक्ती आणि देशाला स्वातंत्र्य मिळून देण्याचा एक जोश होता. बोस त्याच लोकांना आपल्या सेनेत भर्ती करायचे, ज्यांच्या घरात चार मुले असतील. चारपैकी दोघांना सेनेत भर्ती केले जायचे, आणि दोघांनी घर सांभाळण्यासाठी ठेवायचे. 

दोन दशकापर्यंत बर्मामध्ये राहीले

91 वर्षीय अंगुसामी सांगतात, महायुद्धानंतर पुढील 2 दशके ते बर्मामध्ये राहीले. तिथे स्थानिकांच्या भेदभावाचा सामना करावा लागला. 1965 मध्ये त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. 1944 च्या इम्फालमध्ये झालेल्या लढाईत आझाद सेना आणि जापानी सेनेने कॉमनवेल्थने आर्मीला सरेंडर करण्यास भाग पाडले होते. त्या लढाईत 10 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता, पण 1945 मध्ये जापानने सरेंडर केल्यानंतर कॉमनवेल्थ सेनेने आजाद हिंद सेनेच्या अनेक लोकांना पकडले. शेवटी अनेक वर्षानंतर आम्हाला भारतात पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...