आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटफ्लिक्सने बंद केले ऑफिस, संक्रमित कर्मचारी आढळल्यानंतर घेतला निर्णय; विना लाइव्ह ऑडियंसचे चालणार शोज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : कोरोना व्हायरसमुळे ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सला मोठे नुकसान झेलावे लागू शकते. इंग्रजी वेबसाइट व्हरायटीनुसार, नेटफ्लिक्सने लॉस एंजेलिस येथील आपले ऑफिस बंद केले आहे. कंपनीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. 

कंपनीने हे पाऊल एक कर्मचारी कोरोनाने पीडित असल्याचे कळाल्यानंतर उचलले. एवढेच नाही. ज्या बिल्डिंगमध्ये संक्रमित व्यक्ती काम करत होता, तिथे खूप साफ सफाई केली जात आहे. नेटफ्लिक्सव्यतिरिक्त अनेक कंपन्यांनीदेखील पूर्वनियोजन म्हणून आपले ऑफिस बंद केले आहेत. 

विना लाइव्ह ऑडियंसचे होणार शो

कोरोना व्हायरसमुळे अनेक पॉप्युलर शोजने मोठे पाऊल उचलले आहे. ‘जिम्मी किमेल लाइव्ह’, ‘द टुनाइट शो स्टारिंग जिम्मी फॅलन’ आणि ‘द लेट शो विथ स्टीफन कॉलबर्ट’ ने आधीच घोषणा केली आहे की, शोज लाइव्ह ऑडियंसविनाच शूट केले जातील. 

याव्यतिरिक्त अनेक मोठे स्पोर्ट्स लीगदेखील कोरोनामुळे थांबवले गेले आहेत. एमएलबी, एनबीए आणि एनएचएलनुसार व्हायरसमुळे गेम्स पोस्टपोन केलेले गेले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...