आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात या वर्षी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार नेटफ्लिक्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनोद यादव
मुंबई - भारतातील ओटीटी बाजार ११ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. यावर ताबा मिळवण्यासाठी आता नेटफ्लिक्सने २०१९ आणि २०२० मध्ये भारतीय बाजारात ३ हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे सांगितले आहे. नेटफ्लिक्स ही गुंतवणूक ओरिजनल वेब सिरीज आणि चित्रपट बनवणे ते निर्मिती, प्रमोशन, लेखकांसोबत करार आणि अनेक कादंबऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी करत आहे. नेटफ्लिक्सने सांगितले की, रसिकांना चांगला अनुभव मिळावा यासाठी आम्ही प्रत्येक प्रकारच्या जॉन्सवर काम केले आहे. चॉपस्टिकसारखा विनोदी तसेच ऑफ ब्लडसारखे अॅक्शन थ्रिलर्सही तयार केले आहेत.

नेटफ्लिक्स हे करत आहे

1. २० भारतीय वेब सिरीज- चित्रपट रिलीज होतील, ४० पेक्षा जास्त अस्सल भारतीय चित्रपट आणि सिरीजवर काम झाले. सुमारे २० चित्रपट- वेबसिरीज प्रदर्शित. एवढेच येणार आहेत.

2. बाहुबली, कोबाल्ट ब्लूसारखे चित्रपट येतील - बाहुबली, मिडनाइट्स चिल्ड्रेन, अगेन, बॉम्बे बेगम्स, बेतालसहित ९ भारतीय वेबसिरीज येणार आहेत. तर बुलबुल, कोबाल्ट ब्लू, क्लास ऑफ ८३, सिरियस मेनसहित १२ भारतीय ओरिजनल चित्रपटांवर नेटफ्लिक्सवर काम करत आहेत.

3. दहा भारतीय पहिल्यांदा दिग्दर्शक - नेटफ्लिक्ससाठी दहा भारतीय पहिल्यांदा दिग्दर्शन करत आहेत. ९ लेखक पहिल्यांदा मजकूर लिहित आहेत. टीममध्ये ८ अशा महिला आहे ज्या पहिल्यांदा दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून काम करत आहेत. यात गिल्टी चित्रपआच्या दिग्दर्शक रुची नारायण, ये बॅलेच्या दिग्दर्शक सूनी तारापोरवाला आदींचा समावेश आहे.