आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेटफ्लिक्सचे 1.3 लाख युझर्स झाले कमी, सब्सक्रिप्शन किंमत वाढवल्यामुळे झाला परिणाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफॉर्निया - व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्ससाठी एप्रिल-जून तिमाही चांगली ठरली नाही. अमेरिकेत नेटफ्लिक्सचे 1.3 लाख सब्सक्रायबर घटले. विश्लेषकांनी मात्र सब्सक्रायबरची संख्या 3.52 लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. नेटफ्लिक्सने अमेरिकेच्या बाहेर 28 लाख सब्सक्रायबर जोडले. विश्लेषकांनी ही संख्या 48 लाख होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कंपनीच्या शेअरवर या परिणामांचा प्रभाव पाहायला मिळाला. बुधवारी आफ्टर ट्रेडिंगमध्ये नेटफ्लिक्सचे शेअर 12% कमी कोसळले. यामुळे मार्केट कॅप 21.5 अब्ज डॉलर (1.5 लाख कोटी रुपये) कमी होऊन 138.5 अब्ज डॉलर राहिला. 


अमेरिकेत 2011 मध्ये किंमती वाढल्यामुळे सब्सक्रायबर घटले होते 

>  किमती वाढवलेल्या क्षेत्रांमध्ये सब्सक्रायबरची संख्या कमी झाल्याचे नेटफ्लिक्सने सांगतिले. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक सब्सक्रायबर जोडणार असल्याची कंपनीचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी अपेक्षा व्यक्त केली. सध्या नेटफ्लिक्सच्या सब्सक्रायबरची संख्या 15.16 कोटी आहे. नेटफ्लिक्सने जून तिमाहीत ब्रिटन, स्वित्झर्लंड, ग्रीक आमि पश्चिम युरोपात सब्सक्रिप्शन किंमत वाढवली होती. 


> यापूर्वी 2011 मध्ये अमेरिकेतील नेटफ्लिक्स युझर्सची संख्या घटली होती. कंपनीने त्यावेळीही किंमती वाढवली होती. सोबतच डीव्हीडी बाय मेल आणि स्ट्रीमिंग सर्व्हिसेज वेगळ्या केल्या होत्या. 


> नेटफ्लिक्स टीव्ही शो, चित्रपट आणि डॉक्यूमेंट्री बनवून जगभरात ग्राहकांची संख्या वाढवण्यावर भर देत आहे. फायनेन्शिअर मार्केट प्लॅटफॉर्म इन्वेस्टिंग डॉट कॉमचे विश्लेषक क्लीमेंट थिबॉल्ट यांचे म्हणणे आहे की, वाढत्या स्पर्धेत नेटफ्लिक्स किंमत वाढवले आणि युझर्सची संख्या कमी होणार नाही याची कोणतीही गॅरंटी नाही. 


> जून तिमाहीत नेटफ्लिक्सचे उत्पन्न 27.07 कोटी डॉलर (1,868 कोटी रुपये) आणि रेव्हेन्यू 4.92 अब्ज डॉलर (33,938 कोटी रुपये) होते. जुलैमध्ये रिलीज होणाऱ्या सुपरनॅचरल थ्रिलर स्ट्रँजर थिंग्सच्या नवीन सीझनमुळे जुलै-सप्टेंबर तिमाहीत 70 लाख नवीन सब्सक्रायबर जुडण्याची कंपनीला अपेक्षा आहे.