आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - जगातील सर्वात मोठी व्हिडिओ स्ट्रीमिंग कंपनी नेटफ्लिक्सच्या भारतीय शाखेने २०१८-१९ मध्ये ७००% ची वाढ नोंदली गेली. कंपनीला हे यश भारतीय प्रेक्षक लक्षात घेऊन तयार केलेल्या देशी विषयांमुळे मिळाल्याचे सांगण्यात येते. नेटफ्लिक्स इंडियाने २०१९ मध्ये ४६६.७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला. यासोबत कंपनीला भारतात ५.१ कोटी रुपयांचा नफाही मिळाल्याची माहिती कंपनीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीला दिल्या गेलेल्या माहितीतून समोर आली आहे. आर्थिक वर्षात कंपनीने भारतात ५८ कोटी रुपयांचा महसलू प्राप्त केला होता. तेव्हापासून केवळ २० लाख रुपयांचा फायदा झाला होता. यामध्ये आर्थिक वर्षातील ७ महिन्यांचे आकडे समाविष्ट आहेत.
२०१६ पासून बाजारात
कॅलिफॉर्निया आधारित ओटीटी कंपनी नेटफ्लिक्सने २०१६ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. तेव्हा हे पाऊल ग्लोबल रोलआऊटचा हिस्सा होता. २०१७ मध्ये कंपनीने लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपअंतर्गत(एलएलपी) नोंदणी केली आणि भारतीय कंटेंटची निर्मितीची सुरुवात केली. कंपनी प्रदेशानुसार कंटेंट निर्मितीसाठीचा खर्च सांगत नाही, त्यामुळे तिचा ऑपरेटिंग प्रॉफिट कळू शकत नाही.
देशात ऑनलाइन व्हिडिओ पाहणारे ३० कोटी प्रेक्षक, २०२३ पर्यंत ५५ कोटी होतील
> नेटफ्लिक्सच्या यशात भारतात डिजिटल व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या वाढत्या संख्येच्या योगदानातही आहे. सध्या सुमारे ३० कोटी लोक ऑनलाइन व्हिडिओ कंटेंट पाहत आहेत.
> आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत हा आकडा ५५ कोटीपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. भारतात सध्या ३९ कंपन्या व्हिडिओ स्ट्रिमिंग सेवा देत आहेत. २०१२ मध्ये त्यांची संख्या केवळ १२ होती.
> भारतात नेटफ्लिक्सकडे अनेक स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत सध्या कमी प्रेक्षक आहेत. सब्सक्रिप्शन शुल्क जास्त आणि स्थानिक कंटेंट असणे हे त्याचे कारण आहे.
> नेटफ्लिक्सचे ऑल डिव्हाइस सब्सक्रिप्शन ५०० रुपयांनी सुरू होतो. त्याअंतर्गत एकाच वेळी वेगवेगळ्या डिव्हाइसवर कंटेंट पाहण्याची सुविधा मिळत नाही.
> ६५० आणि ८०० रुपयांच्या प्लॅनमध्ये वेगवेगळ्या डिव्हाइसवर कंटेंट पाहण्याचा पर्याय मिळतो. कंपनीने २०० रुपयांत मोबाइल ओनली प्लॅनही लाँच केला आहे.
> प्रतिस्पर्धी कंपनी हॉटस्टारचे सुमारे तीन चतुर्थांश बाजारपेठेवर कब्जा आहे. त्यांचा व्हिआयपी प्लॅन ३६५ वार्षिक व प्रिमियम प्लॅन ९९९ रु. वार्षिक दरावर उपलब्ध आहे.
> अॅमेझॉन प्राइमचा मासिक प्लॅन १२९ रुपयांत आणि वार्षिक प्लॅन ९९९ रुपयांत उपलब्ध आहे. अॅपल टीव्ही प्लसचा मासिक प्लॅन ९९ रुपयांत आहेत.
> येत्या आठवड्यात डिज्नी प्लसची सेवा लाँच होणार आहे. यानंतर भारतात कंटेंट वॉर आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा प्रेक्षकांना मिळू शकतो.
> नेटफ्लिक्स प्रदेशनिहाय सब्सक्रायबरची संख्या जारी करत नाही. अंदाजानुसार मार्च २०१९ पर्यंत भारतात कंपनीचे १०-१२ लाख सब्सक्रायबर होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.