आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या पाच वर्षांत कधीच सरकार पाडण्याचे षडयंत्र रचलेले नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने कधीच सरकार पाडण्याचे षडयंत्र रचलेले नाही. शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी असे म्हटले आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये राहिलो, महायुतीमध्ये असतानाही आमच्याकडे तेवढी ताकद नव्हती. तरीही सरकारशी कधी दगा-फटका केला नाही असेही ते पुढे म्हणाले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूणच 288 पैकी 150 जागांवर भाजप तर 124 जागांवरून शिवसेना लढत आहे. यावेळी प्रथमच ठाकरे घराण्यातून उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणुकीत उतरले आहेत.

आरेवर काय म्हणाले उद्धव ठाकरे..?
आरे कॉलनीत झालेल्या वृक्षतोडीला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी विरोध केला होता. सरकारच्या या निर्णयाला शिवसेनेचा विरोध वर-वरचा होता असेही आरोप करण्यात आले. परंतु, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. "आम्ही मेट्रो कारशेडच्या विरोधात नाही. परंतु, यासाठी जी जागा निवडण्यात आली त्याला आमचा विरोध आहे. विकासकामे करताना लोकांना त्रास दिला जाऊ नये. शिवसेनेने नेहमीच लोकाभिमुख मुद्दे उचलले आणि उचलत राहणार आहे." असे उद्धव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर शिवसैनिकाला बसवणार असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...