आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही हे करता का? चुकूनही करु नका ही 10 कामं, अन्यथा होऊ शकता कंगाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली | अनेक लोक बक्कळ पैसा कमावतात, पण ते पैशांची बचत करु शकत नाही. याचे कारण म्हणजे कळत-नकळत घडलेल्या चुका असतात. यामुळे तुम्हाला दोष लागतात. मग हे कार्य कोणते आणि यापासून कसा बचाव करावा हे जाणुन घेऊया. 


1. वैष्णव पुराणानुसार हिंदू धर्मात तिथींचे विशेष महत्त्व आहे. यामुळे त्या नियमांचे पालन केले जाणे खुप गरजेचे आहे. आजकालच्या मॉडर्न काळात, लोक या गोष्टींवर दुर्लक्ष करतात. पण पुराणांनुसार कोणत्याही महिन्याच्या अमावस्या, पोर्णिमा, चतुर्थी आणि अष्टमी तिथीवर तेल मालिश किंवा मांसाहाराचे सेवन करु नये. 
2. अनेक लोक आरती करताना दिवा जमिनीवर ठेवतात. परंतु शास्त्रांनुसार हे चुकीचे आहे. यामुळे धनहानी होऊ शकते. यामुळे आरतीच्या वेळी दिवा एखाद्या उंच ठिकाणी ठेवा किंवा जमिनीवर कपडा अंथरुन त्यावर ठेवा. 
3. दिव्या प्रमाणेच शिवलिंग, शंख, सोने किंवा देवी-देवतांची मुर्ती जमिनीवर कधीच ठेवू नका. एखादा कपडा अंथरुन किंवा सिंहासनावर ठेवावी. असे न केल्यास वास्तु दोष लागतो. यामुळे धनहानी आणि दुर्भाग्य येऊ शकते. 
4. जे लोक स्त्रीचा अपमान करतात किंवा त्यांच्याशी चुकीच्या पध्दतीने वागतात, त्यांची कधीच प्रगती होत नाही. अशा घरात नेहमी वाद होतो. येथे लक्ष्मीचा वास नसतो. 
5. अनेक लोकांना सुर्यास्त पाहणे खुप आवडते. परंतु पुराणांनुसार व्यक्तीने कधीच सूर्य आणि चंद्र अस्त होताना पाहू नये. असे केल्याने डोळ्यांसंबंधित रोग होण्याची शक्यता असते. 
6. अनेक लोक कळत-नकळत आपले आई-वडील, पुत्र, पुत्री, पतिव्रता पत्नी, श्रेष्ठ पती, गुरु, अनाथ स्त्री, बहीण, भाऊ आदींना चुकीचे शब्द बोलतात. असे केल्याने लक्ष्मी नाराज होते. यामुळे धनवान व्यक्तीही कंगाल होऊ शकतो. 
7. अनेक लोक काश्याच्या भांड्यामध्ये खातात. पण रविवारी या भांड्यात जेवण करु नये. यासोबतच या दिवशी मसूर डाळ, अद्रक किंवा लाल रंगाचे पदार्थ खाऊ नये. कारण हे सर्व सुर्य ग्रहाचे प्रतीक आहे. 
8. जास्तीत जास्त लोक बाहेरुन येऊन डायरेक्टर घरात प्रवेश करतात आणि बेडवर बसतात. लोकांना हे सामान्य वाटते. पण असे करणे दोषाप्रमाणे असते. कारण बाहेरुन आल्यावर आपण आपल्या पायांसोबत दूस-या ठिकाणांची धूळ-माती आणतो. यामुळे घरात नकारात्मकता येते. यामुळे घरात प्रवेश करताना सर्वात पहिले पाय धुवा. 
9. अनेक लोक आपले साहित्य आणि घर अस्ताव्यस्त ठेवतात. पण असे केल्याने लक्ष्मी नाराज होते. कारण ज्या ठिकाणी शांतता आणि स्वच्छता असते, तिथेच लक्ष्मीचा वास असतो.

बातम्या आणखी आहेत...