आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहमी प्रगती आणि सुखाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी या 4 गोष्टींपासून दूर राहावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पद्मपुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांमध्ये गणले जाते. या पुराणामध्ये अशा 4 सवयींविषयी सांगण्यात आले आहे, ज्या कोणत्याही मनुष्याच्या आयुष्याला उद्धवस्त करण्यास कारणीभूत ठरतात. आयुष्यात नेहमी प्रगती आणि सुखाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांनी या 4 गोष्टींपासून नेहमी दूरच राहावे.


श्लोक -
न चात्मानं प्रशंसेद्वा परनिन्दां च वर्जयेत्।
वेदनिन्दां देवनिन्दां प्रयत्नेन विवर्जयेत्।।


1. स्वतःचे कौतुक करू नका
काही लोकांना स्वतःचे कौतुक करण्याची सवय असते. ही सवय मनुष्याला अहंकारी आणि स्वार्थी बनवते. हे लोक नेहमी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही सवय कोणाच्याही आयुष्याला उद्धवस्त करू शकते. यामुळे या सवयीपासून दूरच राहावे.


2. इतरांची निंदा करू नका
एखाद्याची निंदा किंवा अपमान करणे, या दोन्ही गोष्टींना आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत वाईट मानण्यात आले आहे. असे करणारे लोक नेहमी स्वतःचे मूळ काम विसरून जातात आणि इतर लोकांच्या मागे पडतात. यशाच्या मार्गावर पुढे जाण्याची इच्छा असल्यास इतरांची निंदा आणि अपमान करण्यापासून दूर राहा.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 2 सवयींविषयी....

बातम्या आणखी आहेत...