आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र : घरात सुखी-समृद्धी हवी असल्यास पुढील 9 दिवस चुकूनही करू नयेत हे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शारदीय नवरात्री 18 मार्चपासून सुरु होत आहे. या दिवसांमध्ये देवी दुर्गच्या विविध स्वरुपांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या नऊ दिवसांमध्ये आपण काही अशुभ आणि वाईट सवयी, कामांपासून दूर राहिल्यास देवी दुर्गा तसेच धनाची देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त करू शकतो. देवीच्या कृपेने घरात धनाची वृद्धी होते तसेच सर्व कामामध्ये यश प्राप्त होते. येथे जाणून घ्या, या दिवसांमध्ये कोणत्या कामांपासून दूर राहावे...


सकाळी उशिरापर्यंत झोपू नये
तसं पाहायला गेलं तर निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी दररोज सकाळी लवकर उठावे, परंतु अनेक लोक असे सकाळी उशिरा उठतात. शास्त्रानुसार शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सर्वांनी ब्रह्म मुहूर्तावर झोपेतून उठणे आवश्यक आहे. जे लोक या दिवशी सूर्योदयानंतर झोपून राहतात, त्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही.


क्रोध, चिडचिड करू नका -
शारदीय नवरात्रीच्या दिवसांमध्ये क्रोध तसेच चिडचिड करणे अशुभ राहते. जे लोक या दिवसांमध्ये रागराग करतात आणि चिडतात त्यांना लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. घरामध्ये शांत, आनंदाचे आणि पवित्र वातावरण कायम ठेवणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये कोणासोबतही भांडण करू नका तसेच घरामध्ये कलह निर्माण होईल असे वागू नका. घरातील सर्व सदस्यांनी आनंदी मनाने हा सण साजरा करावा. ज्या घरामध्ये वाद, कलह असतो त्या घरात देवी लक्ष्मी वास करत नाही.


मुलींना उष्टे जेवण देणे
मुलींना उष्टे जेवण, विशेषतः नवरात्र काळात चुकूनही देऊ नये. या कृत्याला देवी स्वरूप मुलीचा अपमान मानले जाते. ज्या घरांमध्ये नवरात्र काळात सर्वात पहिले मुलींना जेऊ घातले जाते आणि नंतर कुटुंबातील इतर सदस्य अन्न ग्रहण करतात, त्या घरात देवी स्थिर निवास करते.


नखे कापणे
नख कापणे हिंदू मान्यतेनुसार क्षौर कर्मातील एक मानले जाते. विविध हिंदू उत्सवांमध्ये हे काम करणे वर्ज्य आहे. जो मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नवरात्रीमध्ये नखे कापतो त्यावर देवी रुष्ट होते. नवरात्री काळामध्ये या कामपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.


नशा करणे किंवा दारू पिणे
वास्तवामध्ये हे काम केव्हाही करणे चुकीचे आणि अधार्मिक मानले जाते, परंतु नवरात्रीमध्ये हे काम करणे महापाप मानले गेले आहे. एखादा व्यक्ती देवीची खूप पूजा-अर्चना, उपासना करणारा असेल, परंतु तो नशासुद्धा करत असेल तर त्याची सर्व भक्ती व्यर्थ आहे. नवरात्र काळात हे घोर पाप करणाऱ्या व्यक्तीवर देवी नेहमीसाठी रुष्ट होते.

बातम्या आणखी आहेत...