Home | Jeevan Mantra | Dharm | never dot these things in lakshmi pujan

दिवाळी आणि लक्ष्मी पूजनात चुकूनही करू नका या गोष्टी, अन्यथा देवी निष्फळ होईल लक्ष्मी पूजा

रिलिजन डेस्क | Update - Nov 07, 2018, 12:10 AM IST

पुराणांमध्ये देवी-देवतांचे पूजन आणि जप करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या संदर्भात विशेष माहिती सांगितली आह

 • never dot these things in lakshmi pujan

  दिवाळीला करण्यात येणारा जप आणि पूजन विधी विधिव्रत आणि समर्पण भावनेने करणे आवश्यक आहे. पूर्ण क्रिया आणि श्रद्धेने करण्यात आलेल्या पूजन आणि जपाचे शुभफळ प्राप्त होते. पुराणांमध्ये देवी-देवतांचे पूजन आणि जप करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे, या संदर्भात विशेष माहिती सांगितली आहे. येथे जाणून घ्या, देवी लक्ष्मीची पूजा आणि जप करताना कोणत्या 5 गोष्टी चुकूनही करू नयेत...


  1. शिंकणे
  देवी-देवतांचा जप करताना मनुष्याने आपल्या शिंक आणि खोकल्यावर नियंत्रण ठेवावे. देवाचे स्मरण करताना शिंकल्याने मुख अपवित्र होते आणि अपवित्र मुखाने देवाचे नाव घेणे वर्जित आहे. देवाचा जप करताना शिंक किंवा खोकला आल्यास लगेच हात-पाय, तोंड धुवून पवित्र व्हावे आणि पुन्हा जप सुरु करावा.


  2. जांभई देणे
  जांभई देणे आळसाचे लक्षण आहे. जो मनुष्य सकाळी झोपेतून उठल्यानंतरही जांभई देत राहतो म्हणजे झोपेतच असतो त्याला देवाची पूजा-अर्चना करण्यास सक्त मनाई आहे. धर्म ग्रंथानुसार सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र झाल्यांनतर देवाचे स्मरण करावे. शरीरात आळस घेऊन देवाचे स्मरण चुकूनही करू नये.


  3. क्रोध
  क्रोध म्हणजे राग करणे. विनाकारण प्रत्येक गोष्टीवर राग कडणे सर्वात मोठा अवगुण मानला जातो. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी क्रोध भाव राहतो, तो कोणतेही काम मन लावून करू शकत नाही. देव पूजा आणि साधनेमध्ये मन शांत आणि एकाग्र असणे खूप आवश्यक आहे. अशांत मनाने करण्यात आलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे देवाचे स्मरण करताना क्रोध दूरच ठेवावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर कोणत्या दोन गोष्टी टाळाव्यात...

 • never dot these things in lakshmi pujan

  4. मद (नशा)
  जो मनुष्य नशा करतो त्याला पुराणांमध्ये राक्षस मानले गेले आहे. देवाचे स्मरण करण्यापूर्वी मनुष्याने तन आणि मन दोघांचीही शुद्धी करून घेणे खूप आवश्यक आहे. जो व्यक्ती मद्यप्राशन करतो त्याचे सर्व पुण्य कर्म नष्ट होतात. देवाचे स्मरण करताना नशा करण्याचा विचार करणेसुद्धा महापाप आहे.

 • never dot these things in lakshmi pujan

  5. थुंकणे
  थुंकण्याच्या क्रियेतून मनुष्य शरीरातील घाण बाहेर काढतो. देवी-देवतांचा जप करताना अशा प्रकारची कोणतीही क्रिया करणे वर्ज्य आहे. मनुष्याने स्वतःच्या मनसोबतच शरीराची पूर्णपणे स्वच्छता केल्यानंतरच देवाचे स्मरण करावे. देवाचे ध्यान किंवा पूजा करताना शरीराशी संबंधित कोणतीही क्रिया करावी लागल्यास पुन्हा स्नान करून देवाचे स्मरण करावे.

Trending