Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | never eat these 4 food in night

या 4 पदार्थ सेवनाने तुम्हाला संपूर्ण रात्र जागून काढावी लागू शकते

हेल्थ डेस्क | Update - Dec 08, 2018, 03:39 PM IST

रात्रीच्या जेवणात आपण अशा काही पदार्थांचे सेवन करतो ज्याचा आपल्या झोपेवर वाईट प्रभाव पडतो आणि रात्र जागून काढावी लागते.

 • never eat these 4 food in night

  अनेकवेळा तुम्ही नोटीस केले असेल की रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने चांगली झोप लागत नाही आणि यामुळे संपूर्ण रात्र कूस बदलत जागून काढावी लागते. परंतु कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का, असे कशामुळे होते? कारण रात्रीच्या जेवणात आपण अशा काही पदार्थांचे सेवन करतो ज्याचा आपल्या झोपेवर वाईट प्रभाव पडतो आणि रात्र जागून काढावी लागते. तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर आपल्या खाण्याच्या काही सवयींमध्ये बदल करावा. रात्री झोपेला प्रभावित करणाऱ्या पदार्थांचे सेवन करू नये.


  कॅफिनने सेवन
  काही लोक रात्री झोपण्यापूर्वी कॅफिनचे जास्त प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन करतात आणि याचा थेट प्रभाव आपल्या मेंदूवर पडतो. कॅफिन घेतल्यानंतर याचा प्रभाव जवळपास 5 तास राहतो. यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कधीही कॅफिन घेऊ नये.


  जंक फूडचे सेवन
  जंक फूड तर आजकाल लोकांचे फेव्हरेट अन्न झाले आहे परंतु यामध्ये सॅच्युरेटेड फॅट असते आणि हे पचायला जास्त वेळ घेते. यामुळे रात्रीच्या वेळी जंक फूडचे सेवन चुकूनही करू नये. अन्यथा झोपणे अवघड होईल.


  स्पायसी जेवण
  जेवण तर तिखटच चांगले लागते परंतु रात्री जास्त तिखट खाण्यापासून दूर राहावे. कारण यामुळे छातीत जळजळ आणि पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.


  मीट सेवन
  मीटमध्ये जास्त फॅट आणि प्रोटीन असते आणि हे पचायलाही खूप वेळ लागतो. यामुळे रात्री मीट खाल्ल्याने तुम्हाला अनिद्रेला सामोरे जावे लागू शकते.

Trending