Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Do Not Eat These 7 Things At Night

रात्री या गोष्टींपासून दूरच राहा अन्यथा शरीरावर होतील हे दुष्परिणाम

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 12:04 AM IST

भरपेट जेवल्यानंतर झोप चांगली येतेच, ही धारणा चुकीची आहे. यामुळे अस्वस्थता वाढूही शकते. काही पदार्थ तर असे आहेत

 • Do Not Eat These 7 Things At Night

  भरपेट जेवल्यानंतर झोप चांगली येतेच, ही धारणा चुकीची आहे. यामुळे अस्वस्थता वाढूही शकते. काही पदार्थ तर असे आहेत जे रात्री सेवन केल्यास झोप शांतपणे लागत नाही. काहींनी वजन वाढते. इतर आजारही जडू शकतात. येथे जाणून घ्या, रात्री कोणते पदार्थ खाऊ नयेत...


  पिझ्झा : बहुतेकांच्‍या फ्रिजमध्ये हा असतोच. मात्र, दुपारच्या जेवणात पिझ्झा घ्यावा. रात्री पिझ्झा खाऊ नये.
  का?-पिझ्झाच्या टॉपिंगमधील घटकांनी वजन वाढते. यामुळे छातीत जळजळीची समस्या उद्भवू शकते.

  चिप्स स्नॅक्स : स्नॅक्स सेवन केल्यास तुम्ही रात्रभर झोपू शकणार नाहीत. हे हलके अन्न समजून अनेक लोक रात्री यावर भर देताना दिसतात.
  का?-यात मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अतिरिक्त असते. त्यामुळे झोप उडण्याचीच शक्यता अधिक असते.

  पास्ता :तुम्हाला भूक लागली असेल तर पास्ता चांगला आहार ठरू शकतो. मात्र, रात्री याचे सेवन टाळावे.
  का?-रात्री पास्ता खाल्ल्याने वजन वाढते. कर्बोदकांमुळे चरबीचे प्रमाण झपाट्याने वाढते. रात्री हलका आहार घ्या. पास्ता टाळावा.


  रात्रीच्या वेळी इतर कोणते पदार्थ खाऊ नयेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

 • Do Not Eat These 7 Things At Night

  आइस्क्रीम: रात्रीच्या जेवणानंतर बहुतांश लोक आइस्क्रीम खातात. मात्र, आरोग्यासाठी हे योग्य नाही.
  का?-आइस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्धांश शर्करा असते. पचन करण्याइतपत शरीराची हालचाल होत नाही.

 • Do Not Eat These 7 Things At Night

  मद्य : काहीलो कांना वाटते की मद्य घेतल्यास येणाऱ्या नशेमुळे रात्री झोप चांगली लागते. मात्र, हा समज अगदी चुकीचा आहे.
  का?- झोपेच्या नैसर्गिक प्रक्रियेत मद्यामुळे बाधा येते. मद्यामुळे झोपेचा खोळंबा होतो.

 • Do Not Eat These 7 Things At Night

  मांसाहार : रात्री हे खाऊ नये. त्यामुळे गाढ झोप चाळवू शकते.
  का?- शरीरातील नैसर्गिक क्रिया यामुळे प्रभावित होतात. याचे पचन सहजरीत्या होत नाही.

Trending