आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • New About Examinations For The Students Who Miss Competitive Exams

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पर्धांमुळे परीक्षांना मुकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी परीक्षा; सीबीएसईचा निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत सहभागी झाल्याने परीक्षांना मुकणाऱ्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा मुलांसाठी वेगळी परीक्षा घेण्याचे नियोजन केले जात आहे. क्रीडा स्पर्धेचे व परीक्षेचे वेळापत्रक जुळवताना विद्यार्थ्यांची चांगलीच दमछाक होते. यामुळे सीबीएसईने वेगळ्या परीक्षेचा निर्णय घेतला आहे.

 

खेळाला महत्त्व आणि प्रोत्साहन देण्यासाठी यंदापासून प्रत्येक वर्गासाठी एक तास खेळाचा ठेवण्यात आला आहे. सीबीएसईच्या परिपत्रकानुसार जे विद्यार्थी बोर्ड परीक्षेदरम्यानच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांत खेळणार आहेत त्यांना क्रीडा प्राधिकरणाची परवानगी घेऊन त्यांचे पत्र सीबीएसईच्या विभागीय कार्यालयास ३१ जानेवारीपूर्वी पाठवायचे आहे. यंदा ३० मार्च ते १४ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च व बारावीची परीक्षा ही १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिलपर्यंत चालणार आहे.