आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मदात्रीने टाकून दिले; पण अनेक माउलींनी 'त्या' चिमुकल्याला गोंजारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - तालुक्याातील पात्रुड येेथे रविवारी सकाळी नागरिकांना गावातील नालीत एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून अाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर ग्रामीण पोलिसांनी अर्भकाला ताब्यात घेत उपचारासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. बाळाची प्रकृती ठीक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. बाळाची काळजी घेण्यासाठी रुग्णालयातील परिचारिकांसह विविध सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात हजेरी लावून बाळाची शुश्रूषा करत त्याला मायेची ऊब दिली. 

 

माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथे गावातून सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत रविवारी सकाळी एका बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याचे पाहून नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक आढळून आले. त्याला नालीच्या बाहेर काढून गावातील ताैफिक शेख व जफर कुरेशी यांनी याची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मिर्झा वहाब बेग यांना दिली. 


पोलिस उपनिरीक्षक एस.डी.नरके, पोलिस नाईक राजेंद्र ससाणे, बापू मोरे यांनी पात्रुडमध्ये जाऊन या बाळाला ताब्यात घेतले. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळाचे वजन ३ किलो असून ते एक दिवसाचे आहे. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी दिली. 


गुन्हा नोंद प्रकिया सुरू : या प्रकरणी बाळाच्या माते विरोधात माजलगाव ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. मातेचाही पोलिस शोध घेणार आहेत. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पो.नि. मिर्झा वहाब बेग यांनी दिली. 


महिलांची रुग्णालयात गर्दी 
दरम्यान, पात्रुडमध्ये अर्भक सापडल्याची माहिती माजलगावमधील सामाजिक कार्यकर्त्या महिलांना मिळताच त्याची शुश्रूषा करण्यासाठी अनेक महिला रुग्णालयात आल्या होत्या. परिचारिकांनीही बाळाला मायेची ऊब दिली. चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांनीही माजलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन बाळाची पाहणी केली, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकृतीची माहिती घेतली. 

बातम्या आणखी आहेत...