आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माता न तू वैरिणी..एक दिवसाच्या मुलीची जन्मदात्रीनेच अशी लावली विल्हेवाट, फेकले झुडपात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी', अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. पण, अशी आई कुणालाच नको, असे म्हणायला लावणारी घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या एका दिवसाच्या मुलीला जन्मदात्रीनेच झुडपात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

काय आहे हे प्रकरण?

पिंपरीतील जगताप डेअरी क्षितिज कॉलनी परिसरात बुधवारी (ता.26) ही घटना समोर आली आहे स्थानिक नागरिकांन नवजात शिशु रडण्याचा आवाज येत होता. आवाजाच्या दिशेने त्यांनी जाऊन पाहिले असता झुडपात एक दिवसाचे बाळ रडताना त्यांना दिसले. याबाबत वाकड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीला ताब्यात घेतले आहे. तिला उपचारासाठी औंध शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...