आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तळपत्या उन्हात झाडाखाली ठेवली होती काळी बॅग, कोणीही जवळ जाण्याची हिंमत करत नव्हता; पोलिसांनी बॅगमध्ये डोकावून पाहताच झाले दंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत (गुजरात) - बुधवारी दुपारी जहांगीरपुरा भागात कोणीतरी एका बॅगेत नवजात मुलीला सोडून गेला. सध्या मुलीवर सिव्हीलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांना बॅगमध्ये मिळालेल्या 108 अॅम्बुलन्सची पावती सिव्हिल रुग्णालयातील एक भांड्यांवरून तपास करत आहेत. 

 

दुपारी एक वाजेदरम्यान साई पूजन सोसायटी जवळील एका झाडाखाली काळी आढळली होती. या बॅगजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. दरम्यानं पोलिसांना याठिकाणी पाचारण करण्यात आले. बॅगमध्ये डोकावून पाहताच पोलिस म्हणाले की - यात तर एक गोंडस बाळ आहे. गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे. 


सिव्हिल हॉस्पीटलमध्ये झाला होता मुलीचा जन्म

23 मार्च रोजी सकाळी सिव्हील हॉस्पीटलमध्ये सिझरियनने मुलीचा जन्म झाला होता. आईचे नाव निशा असून ती ओलपाड येथील रहिवासी आहे. बॅगेत मिळालेली पावती आणि गायनिक वार्डमध्ये नोंदवण्यात आलेल्या रेकॉर्डद्वारे माहीत झाले की, निशा रोहित सोळंकीला प्रसुती वेदना होत असल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 22 मार्च रोजी रात्री साडे 11 वाजता तिला सिविल हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले. 23 मार्च रोजी सकाळी मुलीचा जन्म झाला. दोघांवर गायनिक वार्डमध्ये उपचार झाला. महिला येथून मुलीला घेऊन निघून गेली होती. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांदेखील महिलेच्या जाण्याबाबत कोणतीही माहिती नव्हती.