आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 दिवसांपासून कोमात असलेल्या पतीला वाचवणे होते कठीण, डॉक्टर्स म्हणाले- सपोर्ट सिस्टीम काढून टाका, पण पत्नीने दिला नकार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवान्ना- अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये लग्नानंतर 7 महिन्यांत एका व्यक्तीचा अॅक्सीडेंट झाला आणि तो कोमात गेला. 9 दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांना वाटले की, त्याचे वाचणे कठीण आहे, त्यामुळे त्यांनी त्याच्या पत्नीला सपोर्ट सिस्टीम काढावे लागणार असे सांगितले. पण पत्नीने त्यांचे ऐकले नाही आणि उपचार सुरूच ठेवले. काही महिन्यानंतर त्या व्यक्तीला शुद्ध आली आणि पण तोपर्यंत त्याची तीन वर्षांपूर्वी पर्यंतची स्मरणशक्ती गेलेली होती.


डोक्याला लागला होता भयानक मार

- हो गोष्ट अमेरिकेच्या सेवान्ना शहरात राहणाऱ्या डेनियल डेविस आणि हसबँड ब्रायन डेविसची आहे. त्यांचे लग्न 2010 मध्ये झाले होते. लग्नाच्या 7 महिन्यानंतर ब्रायन आपल्या गाडीवरून जात होता तेव्हा त्याचा अॅक्सीडेंट झाला.
- अॅक्सीडेंट इतका भयानक होता की, त्याला ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी झाली आणि डोक्यातील अनेक हडे तुटली त्यामुळे तो कोमात गेला. त्यानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवावे लागले.
- 9 दिवस त्याच्यावर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या वाचण्याचे चांसेस खुप कमी असल्याचे त्याच्या पत्नीला सांगितले. आणि सपोर्ट सिस्टीम काढायला सांगितले. 
- पण पत्नीने डॉक्टरांचे म्हणने नाही ऐकले, आणि उपचार सुरू ठेवण्यास सांगितले. त्याच्या काही महिन्यांनंतर पतीला शुद्ध आली.


शुद्धीवर आल्यावर म्हणाला हे 

- ब्रायनला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो म्हणाला, 'I'm trying' (मी प्रयत्न करत आहे). हे ऐकताच डेनियल खुप आनंदी झाली पण नंतर तिला कळाले की डेनियलची मागच्या तीन वर्षांपर्यंतची स्मरण शक्ती गलेली आहे आणि त्याला त्याचे वडील या जगात नाहीत आणि त्याचे लग्न झाले आहे हेदेखील लक्षात नाही.
- पण त्याला जेव्हा कळाले की डेनियल त्याची पत्नी आहे तेव्हा को खुप आनंदी झाला आणि तो दोघे सोबत राहु लागले. 

बातम्या आणखी आहेत...