आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायक नगररचना संचालकांकडे पुन्हा बांधकाम मंजुरीचे अधिकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका हद्दीतील ३०० चाैरस मीटरपर्यंतच्या नवीन बांधकामांना मंजुरीचे अादेश पुन्हा सहायक नगररचना संचालकांकडे साेपवण्यात अाले अाहे. महापालिका अायुक्त चंद्रकांत डांगे यांनी हे अधिकार स्वत:कडे घेतले हाेते. 


पालिका नगररचना विभागात पूर्वीपासून तीनशे चौरस मीटरपेक्षा मोठे बांधकाम प्रकरणांना आयुक्तांकडून मंजुरी मिळत असे. यापेक्षा छोटी प्रकरणे सहायक नगररचनाकारांकडून मंजूर केली जात असत. मात्र, नगररचना विभागातील प्रचंड गाेंधळ, दुजाभावाचे अाराेप व तक्रारींमुळे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सर्व अधिकार १० जुलैला स्वत:कडे घेतले हाेते. त्यानंतर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कामात अायुक्त व्यग्र असल्याने शेकडाेंच्या संख्येने प्रकरणे रखडली हाेती. 

 

पालिकेच्या निवडणुकीनंतर अायुक्तांनी या विभागातील कामकाजात सुसूत्रता अाणून पुन्हा बांधकामांना मंजुरी देण्यास सुरुवात केली हाेती. त्याचप्रमाणे लाेकप्रतिनिधींकडून या विभागाबाबत केल्या जाणाऱ्या तक्रारीही बंद झाल्या अाहेत. अाता या विभागाचे काम सुरळीत झाल्यानंतर शनिवारी सहायक नगररचना संचालकांकडे ३०० चाैरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार साेपवले. त्यानुसार अाता बांधकामांना मंजुरी देण्यात येणार अाहे. 

 

महापालिकेच्या अायुक्तांनी अशा दिल्या अाहेत सूचना 
बांधकाम परवानगी, अभिन्यासाची प्रकरणे मंजूर बांधकाम नियमावलीने असल्याची खात्री करावी, नियमावलीची पूर्तता नसल्यास पूर्तता पत्र निर्गमित करावे. बांधकाम प्रस्तावात करावयाची दुरुस्ती व बदल रंगीत पेनने स्पष्टपणे दर्शवावे, क्लिष्टता असलेल्या प्रकरणात सहायक संचालकांनी निश्चित कालावधीत चर्चा करावी, भोगवटा प्रमाणपत्र, अभिन्यासाच्या प्रस्तावासोबत टिप्पणीसोबतच स्थळ पाहणी अहवाल जोडावा. बांधकाम, भोगवटा, अभिन्यास परवानगी व प्रमाणपत्रे आयुक्तांच्या परवानगीशिवाय देऊ नये अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...