आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे काँटॅक्टलेस एटीएम कार्ड धाेकादायक; जानेवारीपासून असेच कार्डचे वाटप; याद्वारे पिन व स्वाइप न करता करू शकाल खरेदी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेपाळ- सुरतचे जितेंद्र खत्री हे कुटुंबासाेबत चित्रपट पाहण्यास गेले हाेते. तिकिटे खरेदी करण्यासाठी त्यांनी आपले डेबिट कार्ड दिले. काउंटरवरील कर्मचाऱ्याने १,५०० रुपयांचे पेमेंट घेऊन त्यांना कार्ड परत केले. त्यावर 'मी पिन क्रमांक टाकला नाही तरीही पेमेंट कसे झाले?' याबाबत खत्री यांनी विचारला केली. ताे कर्मचारी म्हणाला- 'तुमचे कार्ड काँटॅक्टलेस आहे. यास कार्डावर २००० रुपयांपर्यंतच्या शाॅपिंगसाठी पिन क्रमांकाची गरज नसते. कार्ड यंत्राजवळ नेताच आपाेआप पेमेंट हाेते.'

 

हल्ली खत्री यांच्याप्रमाणेच किती तरी ग्राहकांना असेच काँटॅक्टलेस पेमेंटचे वैशिष्ट्य असलेले कार्ड मिळत आहे. १ जानेवारी २०१९ पासून विविध बँकांकडून बहुतांश प्रमाणात असेच कार्ड देण्यात येत आहे. मात्र, या नवीन डेबिट व क्रेडिट कार्डाने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. माॅल व दुकानांवर या कार्डांच्या माध्यमातून एकाच वेळी दाेन हजार रुपयांच्या शाॅपिंगसाठी काेणत्याही प्रकारच्या पिन काेडची किंवा ओटीपीची गरज नसते, हे या चिंतेमागील कारण आहे. केवळ या कार्डाचा यंत्राला स्पर्श करताच पेमेंट हाेते; परंतु दाेन हजारांपेक्षा जास्तीच्या खरेदीसाठी पिन क्रमांकाची गरज भासेल. म्हणजेच, तुमचे कार्ड इतर व्यक्तीच्या हातात पडल्यास संबंधित व्यक्ती एका वेळी कमीत कमी दाेन हजारांची शाॅपिंग सहज करू शकते. तसेच आपल्याला माहीत हाेईपर्यंत ती व्यक्ती आपल्या खात्यातून यापेक्षा जास्त रक्कमही काढू शकते. गत काही दिवसांपासून ग्राहकांना विविध बँकांतून व्हिसा, मास्टरकार्ड, रुपे व अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीचे फीचर असलेले डेबिट/क्रेडिट कार्ड मिळत आहेत. त्यात एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस व आयडीबीआय आदी बँकांचा समावेश आहे व यापैकी बहुतांश बँका त्यांच्या संकेतस्थळांसह जाहिरातींमध्ये हे नवीन कार्ड सुरक्षित असल्याचा दावा करत आहेत. या सुविधेमुळे हे कार्ड ग्राहकाकडेच असते व क्लाेनिंगचा धाेकादेखील नसताे. यासाेबतच तिप्पट वेगाने पेमेंटचा दावाही करत आहेत. 

 

काँटॅक्टलेस कार्डच्या सुरक्षिततेशी निगडित प्रश्नावर बाेलताना भाेपाळच्या आयडीबीआय बँकेचे उपमहाव्यवस्थापक श्रीजित म्हणाले की, या कार्डांमुळे सुरक्षिततेला धाेका तर आहेच. कमीत कमी दाेन हजारांपर्यंतची शाॅपिंग विनापिन काेडने केली जाऊ शकते. तथापि, बँकेच्या अॅप्सच्या माध्यमातून याची मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. तसेच सायबर सुरक्षातज्ज्ञ पवन दुग्गल यांनीही या कार्डाच्या माध्यमातून केलेले व्यवहार असुरक्षित व सायबर गैरव्यवहाराला प्राेत्साहन देणारे ठरू शकतात, असे मान्य केले आहे. त्यामुळे या कार्डाच्या सुरक्षिततेसाठी चांगल्या उपाययाेजना करून ग्राहकांना जागरूक करण्याची गरज आहे. यासह ग्राहकांनाही या कार्डाचा वापर समजून-उमजून करावा लागणार आहे. कारण या प्रकरणात केवळ कायदा असणे पुरेसे नाही. तरीही देशात एक कठाेर सायबर कायदा तयार करण्याची आश्यकता आहे. बहुतांश बँकांनी ही मर्यादा एकाच वेळी दाेन हजारांपर्यंतच्या खरेदीची केली आहे. युनियन बँकेने दिवसात ५ हजारांची किंवा ५ व्यवहारांची मर्यादा ठरवली. 'भास्कर'ने बँकांच्या कस्टमर केअर केंद्रांकडे कार्डांची माहिती मागितली असता, ग्राहकांना याची काळजी घ्यावी लागेल, अशी उत्तरे मिळाली. 
 
महिंद्रांकडून चिंता व्यक्त 
काही दिवसांपूर्वी महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ टिवट केले हाेते. त्यात एक जण दुसऱ्या व्यक्तीच्या मागील खिशात ठेवलेल्या कार्डाला गुपचूपपणे यंत्राचा स्पर्श करून पेमेंट घेतल्याचे दाखवत हाेता. त्यावर महिंद्रांनी लिहिले हाेते- 'असे शक्य आहे काय? हे भीतिदायक आहे. 

 

काँटॅक्टलेस कार्डची पद्धती 
हे कार्ड व यंत्रावर एक खास चिन्ह असेल. या यंत्राला सुमारे ४ सेंटिमीटर अंतरावरून हे कार्ड दाखवावे लागेल. यानंतर ग्राहकाच्या खात्यातून पैसे कपात हाेतील. म्हणजेच, कार्डाला स्वाइप वा डिप करण्याची व पिन क्रमांक टाकण्याची गरज नसेल. 

बातम्या आणखी आहेत...