आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या माकडांपासून वाचवा...एम्सच्या डॉक्टरांची याचना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) डाॅक्टर्स, स्टाफ व रुग्ण माकडांमुळे वैतागले आहेत. येथे एका आठवड्यात तीन महिला डाॅक्टरांचा माकडांनी चावा घेतला. त्यावर डाॅक्टरांनी एम्स प्रशासनाला लिहिलेल्या अर्जात नमूद केले की, ‘आम्हाला माकडांपासून वाचवा, आमच्या जिवाला धाेका आहे. माकडे राेज काेणावर तरी हल्ला चढवतात...’ 


विशेष म्हणजे एम्समध्ये रेबीजपासून बचाव करणारी लसही उपलब्ध नाही. याशिवाय डाॅक्टरांनीही माकडे चावली तर भरपाईची देण्याची मागणी केली आहे. माकड चावल्यामुळे रेबीजशिवाय अनेक गंभीर आजार हाेण्याचा धाेका असताे. रेबीजमध्ये मृत्यू दरही १०० टक्के आहे. निवासी डाॅक्टर्स असाेसिएशनच्या पत्रावर एम्सचे उपसंचालक (प्रशासन) सुभाशिष पांडा यांनी सांगितले की, आम्ही माकडांना पिटाळून लावू शकताे, ना त्यांना मारू शकताे. कारण त्यासाठी कायदा परवानगी देत नाही. आमचा नाइलाज आहे. आता तर माकडांना हुसकावण्यासाठी वानरांनाही तैनात केले जाऊ शकत नाही. माकडांपासून सावध राहा, त्यांना खाऊ-पिऊ घालू नका एवढा सल्ला देऊ शकताे. असे असले तरी माकडांना एम्स परिसरातून हाकलण्यासाठी १३ लाेकांना नियुक्त केले आहे. हे लाेक वानराचा आवाज काढतात. त्यांच्यावर दरमहा ३ लाख रुपये खर्च केला जात आहे. दुसरीकडे, माकडांना पकडणारे गुलखान म्हणाले, १० जण िदवसा व तिघे रात्री ड्यूटीवर असतात. रुग्ण येण्या-जाण्याच्या मार्गावर तैनातीचा आमचा प्रयत्न आहे. माकड कधी छतावर तर कधी बेसमेंटमध्ये जातात. तिथे आम्ही जाऊ शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...